विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

भरधाव दुचाकी टिप्पर मध्ये घुसली : २ ठार १ गंभीर**खांबाडा येथील घटना*

*भरधाव दुचाकी टिप्पर मध्ये घुसली : २ ठार १ गंभीर*
*खांबाडा येथील घटना*

वरोडा : श्याम ठेंगडी 
    तालुक्यातील खांबाडा येथील पेट्रोल पंप वरून डिझल भरून वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथे जात असलेल्या टिप्परमध्ये मागून भरधाव वेगात असलेली दुचाकी घुसली. या घडलेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असल्याची घटना खांबाडा येथील उदय बार जवळ १२ फरवरी रोज सोमवारला रात्रौ 8 वाजताच्या सुमारास घडली. 
 या अपघातात मारोती चप्पलवार {२२), वैभव अडबले (२० ) दोघेही राहणार गोठाडी शेगाव, जि. वर्धा  या दोघांचा मृत्यू झाला

प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथील गिता कन्ट्रक्शन कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच ३४ – २८०६ हा डिझेल भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेल्या खांबाडा येथील पेट्रोल पंप वर आला. डिझल भरून परत जात असताना मागून तीन जण बसलेली दुचाकी भरधावं वेगात टिप्परच्या मागच्या बाजूने घुसली.या भीषण अपघातात मारोती चप्पलवार व वैभव अडबले या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.

तिघेही वर्धा जिल्हातील गोठाडी शेगाव येथील रहिवाशी असून हे दोघेही मद्यधुंद असल्याची चर्चा आहे.सुरज नामक युवक जखमी आहे.घटनेची  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी युवकांना वरोड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वरोडा पोलीस करीत आहे.



Comments