अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या**शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी दिले तहसिलदार यांना निवेदन*
*शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी दिले तहसिलदार यांना निवेदन*
वरोरा :
मागील दोन दिवसांपासुन वरोरा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. पावसासोबत गारपिटही मोठ्या प्रमाणावर झाल्याने कापनीला आलेल्या पिके जमिनदोस्त झालेली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतीचा कापनीचा हंगाम सुरू असुन शेतकरी आपल्या शेतीच्या कामात लागलेला आहे. परंतु दि.10 व 11 फेब्रुवारीला झालेल्या गारपिट व अवकाळी पावसामुळे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चना, गहु, तुर,ज्वारी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याकरीता शिवसेना तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांच्या नेतृत्वात तहसिलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची तात्काळ पंचनामे करुन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत मागणी केली. यावेळी वरोरा शहर प्रमुख, खेमराज कुरेकार, उपतालुका प्रमुख सुधाकर बुऱ्हाण , उपशहर प्रमुख, अनिल सिंग, ओकेंश्वर टोंगे, सागर भगत, अमोल जाधव, बलदेव सावनकर, भगवान राजुरकर, राधाकिसन वखनोर, अभि डाखरे, राजु मुडे, प्रज्योत कारकोरे, ओम उईके, सुरेश डहाळकर, वर्षा डहाळकर, प्रतिक डहाळकर, धनराज आसुटकर, सुनिल सालेकर, रामचंद्र सालेकर, रंजना सालेकर, मंदा सालेकर, वैश्नव सालेकर, गोपाल मगरे, साहिल कोलुरपार, रोशन झाडे, वैभव झाडे, गौरव येळेकर, पंडीत झाडे, रामाजी झाडे, रमेश झाडे, मनोहर पाटील, चेतन झाडे, राकेश टापरे,योगीराज लेनगुरे, धनराज आसुटकर, विठ्ठल बावणे, नथ्थुजी वाघाडे, महादेव मडावी, महेंद्र भगत, चेतन कुळमेथे, गोपाल मगरे, प्रविण सालेकर, देविदास आंबिकर, संदिप अस्के, भास्कर लालसरे, सदाशिव वरभे, शुभम लोहकरे, व अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment