वेकोली माजरीची ओव्हर बर्डन वाहतूक पाडली बंद**राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटा तर्फे स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी*

*वेकोली माजरीची ओव्हर बर्डन वाहतूक पाडली बंद*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटा तर्फे स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण दादाजी वनकर यांच्या नेतृत्वात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजरी येथील परिसरात वेकोली ची ओव्हर बर्डन करणारी वाहतूक तब्बल दोन तास बंद पडली. माजरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आंदोलन कर्ते श्रीकृष्ण बनकर व राजू वर्मा यांना ताब्यात घेऊन बंद पडलेली वाहतूक पूर्ववत सुरू केली. माजरी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत.
 या खाणीत अनेक खासगी कंपण्या कार्यरत आहेत मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जात नाही. कंपन्यांमुळे माजरी परिसरात प्रदूषण वाढले असून त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सोसावा लागत आहे. याशिवाय वेकोलीतर्फे ओव्हर बर्डन ची नियम बाह्य वाहतूक करण्यात येत आहे. या समस्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सदर आंदोलन करण्यात आले.या समस्या मार्गी लावून येथील कंपन्यांमध्ये माजरी परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार रोजगार देण्यात यावा व परिसरातील प्रदूषणावर अंकुश आणावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. सदर आंदोलनात माजरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा परिसरातील बेरोजगार युवक सहभागी झाले होते.

Comments