अंतोदय शिधापत्रिका धारक महिलांना मिळणार साडीराज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक.

अंतोदय शिधापत्रिका धारक महिलांना मिळणार साडी

राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक.
चंद्रपूर.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी एक मोफत साड़ी रेशन दुकानातून वितरित करण्यात येणार आहे. या योजनेकरिता राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ४०० अंत्योदय शिधापत्रिकांवर ही साड़ी स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणणार आहे.

या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू असून, होळीपर्यंत लाभार्थीना साडी वितरित केली आणार आहे. या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

त्यानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ साड्यांचे गठ्ठे प्रत्येक तालुक्यातील रास्त भाव दुकानांच्या नावानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्येच्या गोदामात पोहोचविणार आहे. योजनेची अंमलबजाणी करण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली
दरवर्षी मिळणार एक साडी:-
अत्योदय कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक साडी मोफत मिळणार आहे.साड्याचे वितरण स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून केले जाणार.आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्यासह आता साडीचेही वितरण होणार आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हातील अंत्योदय कार्डधारक कुटुंबीयांना प्रत्येकी एक साड़ी स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजन पुरवठा विभागाकडून केले जात आहे. लवकरच वितरण होणार आहे.
- अजय चरडे जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर

होळीपर्यंत होणार वितरण
स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वितरण केले जाणार आहे होळीच्या सणापर्यंत अंतोदय शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका एक याप्रमाणे वितरण केले जाणार आहे.

Comments