वरोरा येथील युवकांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालय ”शिवालय” येथे युवासेनेत पक्षप्रवेश**वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, चंद्रपुर जिल्हा युवासेनाप्रमुख रोहण कुटेमाटे व वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांच्या नेतृत्वात बांधले शिवबंधन!*
*वरोरा येथील युवकांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालय ”शिवालय” येथे युवासेनेत पक्षप्रवेश*
*वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, चंद्रपुर जिल्हा युवासेनाप्रमुख रोहण कुटेमाटे व वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांच्या नेतृत्वात बांधले शिवबंधन!*
*युवासेना उपजिल्हाधिकारी शरद पुरी यांचा पुढाकार*
वरोरा :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 75 वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य उद्धव साहेब ठाकरे नेतृत्वावर विश्वास ठेवून व वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे याचे माध्यमातून सतत सामाजिक व राजकीय क्षेत्रात लोकहितार्थ व जनसेवा हितार्थ कार्याला पेरित होऊन चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा युवा अधिकारी रोहन कुटेमाटे, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज भाऊ कुरेकर, उपजिल्हा युवा सेना अधिकारी शरद पुरी, वरोरा-भद्रावती विधानसभा वरोरा येथील युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्ष प्रवेश केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख पदी रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांची नियुक्ती झाल्यापासुन पक्षात नवचैतन्य संचारले आहेत. तसेच ज्येष्ठ व युवा शिवसैनिकांना सोबत घेवून कार्य करीत असल्याने सर्वाना पक्षात कार्य करण्याची संधी मिळत असते त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन असंख्य शिवसैनिक पक्षात पक्षप्रवेश घेतांना दिसत आहे. हिन्दुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकृत केलेले 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे रविंद्र शिंदे यांनीसुध्दा अंगिकारले असल्यामुळे आणि पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे जनतेचा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढत आहे.
त्याच अनुषंगाने आज दि. 03 फेब्रु. रोज शनिवारला रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन वरोरा येथील महेश लक्ष्मणराव भिवदरे, गणेश प्रभाकर लांजेकर, गणेश संतोष बुरडकर, अमोल मोजेश गज्जलवार, साहिल अशोक येमुलवार, करण सुधाकर अवचारे, मेहराज महादेव दैवलकर, अजय उकुडे, कुनाल वानखेडे, देवानंद मुर्लीधर देऊळकर, सुमित रमेश येसेकर, ईश्वर शंकर देवाळकर, बादल भाग्यवान मडावी, राकेश मुरलीधर देऊळकर, रितिक भारत शिवनकर, हर्षल अरुण पेंदोर, अमर येशु गज्जलवार, प्रेम चंदु येमुलवार, स्वप्नील आगलावे, कुनाल डायरे आदी युवकांनी शिवसेना युवासेनेत प्रवेश घेतला.
याप्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख, 75 वरोरा विधानसभा क्षेत्र रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, चंद्रपूर जिल्हा संघटीका महीला आघाडी नर्मदाताई बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालीका सुष्माताई शिंदे, युवासेना उपजिल्हा अधिकारो शरद पुरी, उपशहर अधिकारी अनिल सिंग, विभाग प्रमुख विनोद वाटमोडे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक, युवासेना सैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment