सिखे प्रदर्शनातून विद्यार्थ्यानी केले गोष्टीचे घटक व अपूर्णांक संकल्पनांचे सादरीकरण*

*सिखे प्रदर्शनातून विद्यार्थ्यानी केले गोष्टीचे घटक व अपूर्णांक संकल्पनांचे सादरीकरण*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             तालुक्यातील चीचोर्डि न्यू व आयुध निर्माणी जिल्हा परिषद शाळा येथे सिखे फाउंडेशनद्वारा सुरू असलेल्या शिक्षक इंनोवेटोर कार्यक्रम अंतर्गत शाळा शाळामधून राबवत असलेल्या भाषा व गणित विषयाच्या नावीन्यपूर्ण उपक्रम यावर आधारित पद्धतीचे  प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी सादरीकरण सुरू आहे.
             वर्षभर सिखेने शिकविलेल्या पद्धतीचे उपयोजन या प्रदर्शनाच्या रूपाने सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने जि.प. प्रा. शाळा, चीचोर्डी न्यू, जि.प. प्रा. शाळा, पिपरबोडी, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आयुध निर्मानी या शाळेत सिखे इंडिया उत्सव अंतर्गत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
         या प्रदर्शनाची सुरुवात गावात प्रभाफेरी काढून शिक्षण विषयक घोषणा देत जागृती करण्यात आली. तसेच मा. प्रकाश खासरे सर केंद्र प्रमुख, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यानी स्वतः बनविलेले पुस्तके , तक्ते, गोष्टीचे घटक, चित्रमय गोष्ट, गोष्ट पूर्णकरा तक्ते, पात्राचे वर्णन, घटनेचा उलगडा अपूर्णकांचे नमुने, आवड चक्र, माझा मनोरा, सुतार पक्षाचे घरटे, समूहाचा एकक अपूर्णांक, करिनाचे कपाट,  एरिया मॉडेलवर  अपूर्णांक  दाखविणे, असा रंगविला पक्षी यासारखे मॉडेल्स विद्यार्थ्यानी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना व पालकांना समजावून सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मा. प्रेमानंद नगराळे सर, मुख्याध्यापिका सौ. मंगला राऊत मॅडम, मुख्याध्यापिका कु. सारिका अलोणे मॅडम  यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना सीखे कोच संतोष वनकर यांनी केले. यावेळेस मोठ्या प्रमाणात शाळेचे विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. कृतियुक्त, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित संकल्पना दृश्यमान रुपात मुले सादर करू शकतात याचे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Comments