उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

*उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

अतुल कोल्हे भद्रावती:
               दारूबंदी उठल्यानंतर शहरात ज्याप्रमाणे शासनमान्य  दारू दुकानात वाढ झाली. त्याच वेगाने घरोघरी अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.ही अवैध दारू दुकाने ज्या वस्तीमध्ये आहे. तेथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आता तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच स्थानिक पोलीस लक्ष देतील काय?असावा सवाल नागरिक करीत आहे.
       शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भर वस्तीमध्येच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपापल्या घरीच दारूचे दुकाने सुरू केलीत.ती २४ तास सुरू असतात. या दुकानदारांना स्थानिक परवानेधारक दुकानदार दारूचा पुरवठा करतात. तसेच शहरालगतच्या तांडा वस्ती मधून हातभट्टीची दारू सुद्धा तिथे पुरवल्या जाते. हातभट्टीची दारू अनेकांच्या जीवावर बेतून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.या अवैध दारू दुकानामुळे वस्तीतील इतर नागरिकांना त्याचा त्रास होऊन त्यांचे सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत आहे. आता तरी याकडे दोन्ही विभागाने लक्ष देऊन कारवाई करून ही अवैध दारूची दुकाने कायमची बंद करावी.अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

Comments