विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करा**

*विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय  रद्द करा*

*भद्रावती वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
              महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे सर्वत्र प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे सदर मीटर लावण्याचे काम त्वरित थांबवून सदर प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी भद्रावती वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा विद्युत निर्मिती करणारा जिल्हा आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा हा सुद्धा जिल्ह्यातच उपलब्ध आहे. या जिल्ह्यात प्रदूषण निर्माण होऊन त्याचा त्रास जिल्ह्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे. अशा अवस्थेत विद्युत विभागाने प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेऊन शहरातील तथा जिल्ह्यातील गोरगरिबांवर अन्याय केला आहे. सध्या विज बिल भरण्यासाठी चाळीस दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र प्रीपेड मीटर लावल्यानंतर मुदत मिळत नसल्याने गोरगरिबांच्या घरात अंधार होण्याची शक्यता आहे. तरी हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे विशाल कांबळे, हरिहर थुलकर, विठ्ठल पुनवटकर,डी.एस. रामटेके, अनुराग खाडे, सतीश मस्के, राखीताई रामटेके, संध्याताई पेटकर आदी उपस्थित होते.

Comments