आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची सदिच्छा भेट.
वरोरा
चेतन लुतडे वरोरा
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने २ फेब्रुवारी पासून फन फेस्टचे आयोजन तालुका क्रीडा संकुल येथे भव्य दिव्य रोषणाईत करण्यात आले.
या पाच दिवसाच्या महोत्सवात बऱ्याच राजकीय ,सामाजिक मान्यवरांनी भेटी दिल्या.
वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार , चंद्रपूर यांनी या महोत्सवास भेट देऊन कल्पतरू मंडळास शुभेच्छा व्यक्त केल्या. यापेक्षाही मोठे आयोजन मंडळातर्फे करण्यात यावे या क्षेत्राचे आमदार म्हणून काही मदत लागल्यास लहान बहीण म्हणून हक्काने मागून घ्यावी. असे वक्तव्य आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्याने आयोजन मंडळाच्या सदस्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
वरोरा शहरासाठी पर्वणी ठरलेल्या मेळाव्यात छोट्या कलाकारांनी कल्पतरू व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. वेगवेगळ्या दिव्यांनी सजवलेले भव्य दिव्य मैदान, मोठे मोठे बॅनर्स प्रत्येक व्यक्तीला मोहीत करत होते . मेळाव्यामध्ये देशी विदेशी पदार्थांचा आस्वाद वरोराकरांनी घेतला . परिसरातील उंच झुले लहान मुलांचे आकर्षण बनले होते. नामांकित कंपन्यांचे स्टॉल व प्रदर्शनी या मेळ्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनले होते. पुढील वर्षी याहीपेक्षा मोठे आयोजन करण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू महाजन, चेतन शर्मा, शशी चौधरी, दर्शन मालू ,परीक्षित एकरे, तरुण वैद्य, निकेश संचेती, नीरज चौधरी, प्रणय मालू यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम केले.
Comments
Post a Comment