विंजासन रस्त्यालगतचे पेवर ब्लॉक बांधकाम निकृष्ट दर्जाचे**माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा आरोप*

*विंजासन रस्त्यालगतचे पेवर ब्लॉक बांधकाम निकृष्ट दर्जाचे*

*माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा आरोप*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                   विंजासन सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉक लावण्याचे बांधकाम सुरू आहे.मात्र सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असून हे दीर्घकाळ टिकणार नसल्याचा आरोप शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केला असून याबाबत आपण संबंधीत विभागाकडे  लवकरच तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. भद्रनाग मंदिर ते विंजासन या 3.75 मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आले. एक वर्ष उशिरा तयार करण्यात आलेला हा रस्ता सुरुवातीपासूनच वादात राहिला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा प्रति बाजू दीड मीटर रुंदीचे पेवर ब्लॉक लावण्यात येत आहे.नागरीकांच्या तक्ररीनंतर या बांधकामाची पाहणी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व माजी नगरसेवक सुधीर सातपुते यांनी केली असता पेवर ब्लॉक लावण्यासाठी तयार करण्यात येत असलेले पडदीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे अनिल धानोरकर यांनी सांगितले. या पडदीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात हे बांधकाम लवकरच उखडेल व त्याचा त्रास आधारित रस्त्यावरील रहदारीला होईल असा आरोप त्यांनी केला आहे. हा रस्ता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विंजासन येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी कडे जात असल्याने या रस्त्यावर जड वाहनांची मोठी रहदारी असते. याशिवाय हा रस्ता सतत वर्दळीचा आहे. अशा अवस्थेत हे बांधकाम दीर्घकाळ टिकणार नसल्याचा आरोप धानोरकर यांनी केला आहे. या संदर्भात आपण लवकरच संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Comments