निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.*गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .
*
गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणारे मांगली- तुंमगाव मागील कित्येक वर्षापासून शासकीय योजनेपासून आणि सुख सुविधांपासून वंचित आहे. शासनाला बरेचदा मागण्या निवेदन सादर केले परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून या गावात येणारी शासकीय यंत्रणा बंद करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रोडच्या मधोमध बैल बंड्या आडव्या करून शासकीय यंत्रणेला बंदी घातली आहे. यावेळी गावातील जनतेने "शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद," कामचुकार अधिकाऱ्यांचा निषेध असो. पाझरबोडी तलाव झालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे., असे अनेक नारे देत रस्ता अडवून धरला आहे. यावेळी शासकीय यंत्रणेला गावातील लोक काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहे.
गावकऱ्यांनी शासनाला आपल्या मागण्या सादर केले आहे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव बंदी उठणार नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे.