त्या अपंगग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी रोखली केपीसीएल कंपनीची कोळसा वाहतूक**चार तास कोळसा वाहतूक ठप्प*

*त्या अपंगग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी रोखली केपीसीएल कंपनीची कोळसा वाहतूक*

*चार तास कोळसा वाहतूक ठप्प*

अतुल कोल्हे भद्रावती -  
                बरांज येथील अपंग संतोष पुनवटकर याची तीन एकर शेत जमीन केपीसीएल कंपनीने संपादित केली व त्याला तीन एकराचे तीन लाख रुपये मोबदला दिला व अतिरिक्त मोबदला दिला नसल्याने गेला १६ दिवसापासून त्याचेही केपीसीएल कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे त्याने आज सकाळी नऊ वाजता केपीसीएल कंपनीच्या रस्त्यावर उभा राहून तब्बल चार तास  कोळसा भरलेली ट्रक रोखले मात्र ठाणेदाराच्या मध्यस्थीनंतर त्याने हे आंदोलन मागे घेतले.
 संतोष पुनवटकर याची शेती सर्वे नंबर २१८ दिनांक २३ / १० / २००९ च्या आव्हार्ड मध्ये नाव नसताना कर्नाटक एम्टा कंपनीने शेतजमीन खरेदी केली व त्या अपंगग्रस्ताला तीन एकराचे तीन लाख रुपये मोबदला दिला त्यानंतर हीच शेत जमीन कर्नाटकाएम्टा कंपनीने दिनांक ८ / २ / २०२० मध्ये फेरफार घेतला दिनांक ९ / २ / २०२० ला नोटीस काढून १० / २ / २०२० ला केपीसीएल कंपनीच्या नावाने संपादित केली केवळ तीन दिवसात फेरफार घेऊन त्या अपंगाला केवळ तीन लाख मोबदला दिला  आज त्याच्याच जमिनीवर खड्डा करून कोळशाचे उत्पादन सुरू आहे. मोबदल्याची अतिरिक्ति रक्कम दिली नसल्याने त्याने वारंवार कंपनीकडे मागणी केली अखेर त्याने आपल्या मागणीसाठी कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे त्याचा आंदोलनाचा आज १६ दिवस आहे

Comments