सिध्दिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा येथे फार्मा फिस्टा स्नेहसंम्मेलन २०२४ संपन्न..

सिध्दिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा येथे फार्मा फिस्टा स्नेहसंम्मेलन २०२४ संपन्न..

वरोरा/सादिक थैम.

अभिनव बहुउध्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित. सिध्दिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा येथे फार्मा फिस्टा स्नेहसंम्मेलन २०२४ व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला या स्नेहसंमेलनाच्या सुरुवात दि. १४ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या दरम्यान मान्यवरांच्या उपस्तिथ क्रीडा मोहत्सव व सांस्कृतिक मोहत्सव घेण्यात आला.

त्यामध्ये कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख पाहुणे आनंद निकेतन ऑर्ट, कार्मस, सायन्स वरोरा चे प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर, मा. सुनिल सातपुते सर प्रेसिडेन्ट केमिस्ट असोसिएशन वरोरा, डॉ. आशिष पिसे सर, डॉ. पुजा पिसे मॅडम प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष मा.प्रसाद पु.कथडे सर, उपाध्यक्ष निखिला पु. कथडे. मॅडम सचिव पुजा कथडे मॅडम व प्राचार्य :- डॉ. रितेश बाठे सर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून व सरस्वती वंदनेद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..

तसेच मान्यवरांनी विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. मृणाल काळे सरांनी फार्मसीच्या विद्यार्थांना मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारावा त्यासोबतच हर्बल आणि नॅनोटेक्नालाजी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले, संस्थेचे अध्यक्ष मा. प्रसाद पु.कथडे सर यांनी स्नेहसंमेलनाबद्दल व फार्मसी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या स्नेहसंम्मेलनमध्ये क्रिडा महोस्तव व सांस्कृतिक मोहत्सव मध्ये विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरीता क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो इत्यादी विविध प्रकारचे खेळाचे आयोजन करण्यात आले व विवीध प्रकारचे नूत्य, गायन, नाटीका व विवीध वेशभुषा कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शंभर हून अधीक विद्यार्थांनी उत्साहपुर्व सहभाग घेतला.

त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. प्रसाद कथडे सर व प्राचार्य डॉ. रितेश बाठे सर यांनी विद्यार्थांना योग्य असे मार्गदर्शन केले व विध्यार्थांच्या प्रगतीकरीता आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे आव्हान केले.

या स्न्हेहसंमेलनातील पदवी-पदविका अभ्यासक्रमातील प्राविन्य विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व प्रमापत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर विविध खेळांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे विध्यार्थी विजयी झाले त्यांना बक्षीस व प्रमानपत्र देऊन स्तकार करण्यात आला..

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता क्रिडा विभाग प्रमुख व सांस्कृतीक विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनातून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Comments