प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात फत्तापूर ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा*

*नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या नेतृत्वात फत्तापूर ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा*

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे नेतृत्वात आज दिनांक 02/02/2024 रोजी फत्तापूर ग्रामपंचायत च्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तालुका संघटक विलास वायदुडे यांच्या प्रयत्नाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा सरपंच फत्तापूर ग्रामपंचायत मध्ये विराजमान झाला . सरपंच पदी प्रियंका प्रवीण येलके,उपसरपंच पदी विलास लक्ष्मण वायदुडे,ग्रामपंचायत सदस्य गणेश जोगी, कोकिळा वायदूडे, सुनील गेडाम, गीता मेश्राम सात पैकी सहा सदस्य हे शिवसेनेचे असून फत्तापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला यावेळी वरोरा तालुका प्रमुख श्रीकांत  खंगार, आशिष ठेंगणे जिल्हा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, राजेश डांगे शहर प्रमुख वरोरा, कल्पनाताई भुसारी उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी वरोरा विधानसभा क्षेत्र व सर्व शिवसैनिक उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे जिल्हाप्रमुख नितीन मध्ये यांनी अभिनंदन केले आहे.

Comments