*बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध इसमाचा बळी**दोन दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी**अश्या प्रकारच्या भरधाव वेगाने या आधी शहरात अनेक निरपराध नागरिकांचा गेला बळी*

*बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध  इसमाचा बळी*

*दोन दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी*

*अश्या प्रकारच्या भरधाव वेगाने या आधी शहरात अनेक निरपराध नागरिकांचा गेला  बळी*

 अतुल कोल्हे भद्रावती :-
              तरुणाईच्या बेलगाम भरधाव बाईकने शहरात आणखी एका निरपराध इसमाचा बळी घेतला. मागून येणाऱ्या भरधाव बाईकने एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 55 वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अठरा वर्षीय युवकास उपचारार्थ चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
            सदर घटना दिनांक 28 रोज बुधवारला रात्र 10 वाजताच्या सुमारास शहरातील गवराळा  रस्त्यावरील आदित्य बारजवळ घडली. मोरेश्वर घोडाम वय 55 वर्ष, राहणार ढोरवासा, असे मृतक इसमाचे नाव आहे. तर या अपघातात प्रल्हाद राजू मेडपल्लीवार वय 18 वर्षे राहणार गवराळा हा गंभीर जखमी झाला आहे. मृतक मोरेश्वर घोडाम हा आपल्या हिरो स्प्लेंडर एमएच ३४ पी ३६ ९७ या दुचाकीने गवराळ्याकडे येत असता आदित्य भारजवळ अचानक लाईन गेली. त्याच वेळेस मागून भरधाव येणाऱ्या एम एच 34 cf 54 67 या बजाज पल्सर दुचाकीने घोडाम यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की अपघातात मोरेश्वर घोडाम यांचा जागीच मृत्यू झाला. तर बजाज पल्सर गाडीचा चालक प्रल्हाद मेडपल्लीवार हा गंभीर रित्या जखमी झाला. सदर जखमी युवकाला चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितल्या नुसार दोन युवकांनी बाईक रेस लावली होती यात संतुलन गेल्याने सदर बाइकन घोडाम यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. भरधाव वेगाने या आधी शहरात अनेक निरपराध  नागरिकांचा बळी गेला आहे. यात घोडाम यांच्या मृत्यूने आणखी भर पडली आहे. शहरातील बेलगाम व भरगाव बाईक स्वारांमुळे शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


Comments