वनोजा मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव थाटात साजरा* *महाप्रसादाचा १०००० भाविकांनी घेतला लाभ*

*वनोजा मंदिरात श्री गणेश जन्मोत्सव थाटात साजरा*

 *महाप्रसादाचा १०००० भाविकांनी घेतला लाभ*


 वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा

      वरोडा तालुक्यातील वनोजा येथील श्री गणेश मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.हे मंदिर तालुक्यात व जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारे हे देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आज 13 फरारी रोज मंगळवारला श्री गणेश जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा केला गेला.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सवानिमित्य श्री गणेशमूर्तीचा अभिषेक, होम हवन, गणेश याग यज्ञ यासारखे धार्मिक अनुष्ठान सकाळपासून आयोजित करण्यात आले होते . दुपारी 3 तीन वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात झाली वरोडा शहर व परिसरातील जवळपास दहा हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
      डॉक्टर हटवार ,श्री व सौ संदीप मुथा,प्रमोद बोढे, महेश उत्तरवार,श्रीवन हसानी यांनी यावर्षीच्या श्री गणेशजन्मोत्सवाचे यजमानपद स्विकारले होते. 
      यावेळी श्री गणेश मंदिरात 33 वर्षांपासून सेवा देणारे पंडित त्रिशाम बोस यांच्या नेतृत्वात अनेक 
गणेशभक्तांनी परिश्रम घेतले.

Comments