माजरी परिसरात महिलांसाठी लघुउद्योग निर्मीती बैठक संपन्न**शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उपक्रम**वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*माजरी परिसरात महिलांसाठी लघुउद्योग निर्मीती बैठक संपन्न*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उपक्रम*

*वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

माजरी (भद्रावती) : 
महिला स्वावलंबी व्हाव्या, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, महिला उद्योजकतेला समर्थन आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे माजरी येथे महिलांसाठी आज (दि.२२) ला लघुउद्योग निर्मीती बैठक एचएमएस युनियन ऑफिस, माजरी कॉलरी येथे प्राथमिक सभा संपन्न झाली.

वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात, उपजिल्हाप्रमुख तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती भद्रावती भास्कर पाटील ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख नंदूभाऊ पढाल, उपतालुकाप्रमुख रवि भोगे, विभागप्रमुख बंडू मांढरे, माजरी शहरप्रमुख रविशंकर राय यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम घेण्यात आला.

माजरी परिसरात लघु उद्योग निर्मीती करण्याकरीता व माजरी-पाटाळा क्षेत्रातील महिलांना उद्योजक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी लघुउघोग निर्मीतीबाबत या सभेत चर्चा घडून आली. 
या सभेत माजरी परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. यात लघु उद्योग निर्मिती करण्याकरीता महिलांची मते जाणून घेतली. त्यानुसार मार्गदर्शन करण्यात आले. याकरीता अनेक महिलांनी नव-नविन लघु उद्योग सुचविले. त्यांची माहीती सुध्दा त्यांचे कडुन जाणून घेवुन लघुउघोग उभारण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी अनेक महीला समोर आल्या. यामध्ये प्रथम प्राथमिक स्तरावर २० शिलाई मशीनचे युनिट उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छूक नावांची नोंदणी सुध्दा केल्या गेली. तसेच या मध्ये भविष्यात महिलांचा प्रतिसाद पाहता त्याला पुढे चालना देण्यात येईल, असे ठरले. तसेच या व्यतिरिक्त महिलांनी सुचवलेल्या ईतर लघुउघोगाबाबत माहीती घेवुन त्यांची सुध्दा उभारणी करण्यात येणार आहे. 

या करिता चंद्रपुर जिल्हा सघंटीका नर्मदा बोरेकर यांचे मार्गदर्शनात प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात नियोजन करण्यात येत आहे. तालुका महिला संघटिका आशाताई ताजने, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती व चंद्रपुर जिल्हा युवती समन्वयक सौ. अकलेषा मंगेश भोयर (जिवतोडे), माजरी-पाटाळा जिल्हा परिषद विभाग महिला संघटीका सौ. गायत्रीताई यमलावार यांच्या पुढाकाराने माजरी येथील लघुउघोग निर्मीती साठी सभा संपन्न झाली. 

याकरीता माजरी उपविभाग सघंटीका मायाताई सिडाम, पाटाळा उपविभाग संघटीका मनिषा वैद्य, निर्मला आत्राम, उषा गौतम, उर्मिला प्रसाद, मधु ठाकुर (कार्यवाहक), रानी तोटा, चंदा वेले, सुषमा रामटेके, रूपा जांभूळकर, चंदा गोनडे, वैशाली पिंपळकर, नागलोन शाखा प्रमुख बबिता जगनाके, पाटाळा ग्रामपंचायत सदस्या वंदना बंडूजी मांढरे व अनेक युवती व महीला भगिनी उपस्थित असुन भाग घेतला.

Comments