जिल्हा अधिकाऱ्याच्या दालनात केपीसीएल कंपनीची चुपी**महिला आंदोलन करत्यांना केपीसीएल कंपनीने दिले नाही एकाही प्रश्नाचे उत्तर**बरांज मोकासा प्रकल्पग्रस्त महिलांचे आंदोलन**जिल्हा अधिकाऱ्यानी केपीसीएल कंपनीला बजावला नोटीस*

*जिल्हा अधिकाऱ्याच्या दालनात केपीसीएल कंपनीची चुपी*

*महिला आंदोलन करत्यांना केपीसीएल कंपनीने दिले नाही एकाही प्रश्नाचे उत्तर*

*बरांज मोकासा प्रकल्पग्रस्त महिलांचे आंदोलन*

*जिल्हा अधिकाऱ्यानी केपीसीएल कंपनीला बजावला नोटीस*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                   कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल ) कंपनी विरोधात बरांज येथे उपोषणकर्त्यांचे गेल्या ५२ दिवसापासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला तोडगा निघावा यासाठी दिनांक २ फेब्रुवारीला जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयात केपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्याच्या समक्ष बैठक लावण्यात आली मात्र आंदोलन कर्त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर कंपनीने दिले नसल्याने तात्काळ ते आंदोलन कर्त्याचे १२ प्रश्नाचे  उत्तर द्या असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले
 बराज मोकाचा प्रकल्पग्रस्तांचे १८ मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे मात्र त्याचा तोडगा निघत नसल्याने आज दिनांक 2 फेब्रुवारीला अप्पल जिल्हाधिकारी देशपांडे यांच्या दालनात केपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्या समक्ष महिला आंदोलन कर त्यांच्या वतीने तलाठी विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हजर झाले. केपीसीएल कंपनी म्हणते खुल्या कोळसा खाणीसाठी ताबा घेतला नाही, महसूल अधिकारी म्हणतात ताबा कंपनीला दिला नाही मग या कंपनीला कोळसा उत्खननाचा ताबा कोणी दिला अशा बारा प्रश्न घेऊन आंदोलन कारी आक्रमक झाले या त्यांच्या प्रश्नावर केपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन या बारा प्रश्नाचे उत्तर मला लवकर द्या व या आंदोलन करत्यांना सुद्धा याबाबत तात्काळ माहिती द्या व या बरांज मोकासा आंदोलन कर्त्याचे निराकरण करा असे आदेश या बैठकीत  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले या बैठकीला शासनाच्या वतीने जिल्हा अधिकारी, भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार केपीसीएल व कर्नाटक एम्टा च्या वतीने भट्टाचार्य, वासाडे, जिपकाटे तर बरांज प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विनोद खोब्रागडे व गावकरी उपस्थित होते.

Comments