दुकानात अवैध दारू पिऊ देणाऱ्या दुकानदारावर पोलिसांची कारवाई.

दुकानात अवैध दारू पिऊ देणाऱ्या दुकानदारावर पोलिसांची कारवाई.

वरोरा/
20/2/24

वरोरा शहरातील नेहरू चौकात असणाऱ्या देशी भट्टी व निर्वाण वाईन शॉप  समोरील दुकानदार चिल्लर व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या दुकानात अवैध दारू पिऊ देत होते. त्यामुळे शहरातील नेहरू चौक परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या महिला व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. दिनाक 19.02.2024 रोजी शिवजयंती मिरवणूक दरम्यान  अवैध दारू पिऊ देणाऱ्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून  दुकानदारावर  गुन्हा नोंदविला आहे. तसेच पोलीसांनी आव्हान केली आहे की,  दुकानदारांनी अवैध दारू पिऊ देऊ नये ज्यामुळे नागरिकांना त्रास होईल.
सदर ची कार्यवाही नोओमी साटम  उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक काचोरे  यांचे निर्देशाने   डिबी इन्चार्ज यागेंद्रसिंह यादव व त्यांची टीम ने केली.