राहुल खापने बनले चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले ' टायगर मॅन-१२२*

**राहुल खापने बनले चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले ' टायगर मॅन-१२२*

वरोरा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले श्री.राहुल दिगांबरजी खापने यांनी ११ फेब्रुवारीला नागपूर येथे आयोजित मॉईल टायगर मॅन ट्रायथलॉन या स्पर्धेत ज्यात अंबाझरी तलावात २००० मीटर पोहणे,नागपूर ते सावनेर १०० किमी सायकलिंग जाणे येणे आणि मॉयल हेड क्वार्टर व्हाया फुटाळा नागपूर २० किमी धावणे. अशी ही स्पर्धा असून फिजिकल फिटनेस साठी ही स्पर्धा घेतली जाते. वरोरा शहरातून अशा स्पर्धकाची निवड होणे वरोरावाश्यांसाठी अभिमानाचे स्थान आहे.

 यात टायगर मॅन-१२२ गटात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले असून ही स्पर्धा त्यांनी ६ तास ५८ मिनिटाच्या वेळात सलग पूर्ण केली.या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात जवळपास ३०० अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता हे विशेष, त्यांनी स्पर्धेत प्राप्त केलेल्या यशा बद्दल प्रत्येक स्तरांमधून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून ,त्यांनी या यशाचे श्रेय आई सौ.प्रभावती व वडील श्री दिगांबरजी खापने यांना दिले असून MNM स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक व कोच श्री.डॉ अमित समर्थ, नागपूर तसेच मॉर्निंग वॉक  ग्रुप , गांधी उद्यान योग मंडळ, आनंदवन मित्रपरिवार आधी संस्थानी व मित्रपरिवाराने यांचे विशेष अभिनंदन व्यक्त केले आहे .

गेल्या कित्येक वर्षापासून राहुल खापणे हे आनंदवन ग्राउंड वर आपली प्रॅक्टिस करताना दिसत होते. रोज नित्यनेमाने सकाळी सायकलिंग आणि व्यायाम करणे हा त्यांचा नित्य कार्यक्रम होता. या वयात सुद्धा अशा प्रकारचे सातत्य असणे ही कमालीची बाब आहे.  बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरोरा मध्ये ते सध्या कार्यरत असून त्यांनी प्राप्त केलेल्या  यशाबद्दल त्यांच्या सहकार्याने त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या चिकाटी ,जिज्ञाशू कृतीला वरोरावाशिया कडून सलाम.


Comments