सामाजिक कार्यकर्ते किशोर डूकरे यांच्या चार मागण्या पूर्ण.पिक विमा कंपनीला नमविले. ग्रामपंचायत मध्ये याद्या लागल्या

सामाजिक कार्यकर्ते किशोर डूकरे यांच्या चार मागण्या पूर्ण.

पिक विमा कंपनीला नमविले. ग्रामपंचायत मध्ये याद्या लागल्या

वरोरा 18/2/24
चेतन लुतडे 

सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण उभारले , कोणत्याही राजकीय पक्षाचा व नेत्यांचा आधार न घेता आसाळा येथील राहवासी असलेला साधारन शेतकरी काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण किशोर डुकरे यांच्या रूपाने पाहायला मिळाले. उपोषणा च्या पाचव्या दिवशी चार मागण्या शांततेने मान्य करून दाखवल्या. त्यातील पीक विमाच्या मागणीची दखल कृषी विभाग व विमा कंपनीने घेत शनिवारी वरोरा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये यादया प्रसिद्ध केल्याने किशोर डुकरे यांच्या आंदोलनाचं फलित झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यात उमटू लागल्या. शेतकऱ्यांसाठी तळमळ असणाऱ्या या गरीब नेतृत्वाला शेतकऱ्यांनी डोक्यावर उचलून धरले आहे. 
आंदोलन जरी पाचव्या दिवशी संपले असले तरी शेतकऱ्या विषयीची तळमळ त्यांनी बोलून दाखवली.
कापसाला दहा हजार रुपये भाव, शेतीतील पांदण रस्ते काढून देणे, वरील मागण्या मान्य न केल्यास पुन्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशाराही  पत्रकारांशी बोलून दाखवला.

या आंदोलनात सहभागी झालेला मित्रपरिवार व सहकार्याचे त्यांनी धन्यवाद मानले असून शेतकऱ्यांसाठी याच पद्धतीने लढण्याचे आश्वासन शेतकरी मित्रांना त्यांनी यावेळी दिले. त्यांची प्रकृती ठीक असून ते स्वभावी आसाळा येथे गेले आहे.

ओरिएंटल बँक अधिकारी
पत्र क्रमांक , दिनांक २० सप्टेंबर २०२३ अन्वये मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी यांनी सोयाबित पिकाचे झालेल्या नुकसानीचा २५ टक्के पिकविमा मंजुर करुन शेतकन्यांच्या dbt लिंक ,आधार लिंक बैंक खात्यात जमा केलेला आहे. मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी कडुन प्राप्त झालेली यादी प्रत्येक ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
ज्या शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पिक विमा रक्कम जमा झाली नसल्यास त्यांनी त्याबाबत चा तक्रार अर्ज संबंधीत कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी, वरोरा कार्यालयात जमा करावा.

Comments