शासकीय यंत्रणेच्या गैरवापरामुळे सध्याची लोकशाही धोक्यात : प्रा. श्याम मानव**भारतीय लोकशाही टिकविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे व मतदारांनी जागरूक असणे आवश्यक*

*शासकीय यंत्रणेच्या गैरवापरामुळे सध्याची लोकशाही धोक्यात : प्रा. श्याम मानव*

*भारतीय लोकशाही टिकविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे व मतदारांनी जागरूक असणे आवश्यक*
अतुल कोल्हे भद्रावती :-
         आज समाजाप्रती निष्ठेने काम करणाऱ्या लोकांवर भ्याड हल्ले होत आहे. त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.  सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय समता मिळणे हीच खरी लोकशाहीची व्याख्या आहे. अंधश्रद्धे विरुद्ध काम करीत असताना काही लोकांचा त्रास होत आहे. परंतु जनकल्याणाकरिता हे कार्य मी अविरत सुरू ठेवण्याची आपणा सर्वांना ग्वाही देतो. मी जाती-पाती ला कधी थारा देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जाती वर्णावर विस्तृत वर्णन करीत आजच्या राज्यघटनेचे नीतिमूल्य सर्वांनी जपले पाहिजे. आज विचार करण्याचे स्वातंत्र्य नष्ट झाले आहे. देशात सांप्रदायिक वातावरण तयार झाले, त्यामुळे मूठभर लोक सत्तेवर आले त्यामुळे देशातील वातावरण खराब होत चालले आहे. आज सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा तरच देशाची खरी उन्नती होते. मनुवाद्यांनी डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कसा खोटा ठरविला ते सविस्तर स्पष्ट करीत आज अवैज्ञानिक अंधश्रद्धा पसरवली जात आहे. तसेच अवैज्ञानिक गोष्टीचा अवलंब करणे हीच आजच्या लोकशाहीला घातक आहे. आज सर्व सरकारी नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम सुरू आहे. आज देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती कशी बिकट झाली आहे. तसेच आज ईडी सारख्या संस्थांचा कसा गैरवापर होत आहे हे सविस्तर स्पष्ट करीत आज मतदारांना जागरूक असणे आवश्यक आहे. तरच देशाची लोकशाही टिकेल व देश सुरळीत चालेल. भारतीय लोकशाही टिकली पाहिजे त्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा आयोजित निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात जाहीर व्याख्यानात प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक श्याम मानव, राजकीय विश्लेषक व संस्थापक संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
              या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट भूपेंद्र रायपुरे, ज्येष्ठ विधीतज्ञ, भद्रावती, एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, ज्येष्ठ विधीतज्ञ, चंद्रपूर, एडवोकेट गोविंद  भेंडारकर, विधीतज्ञ ब्रह्मपुरी, श्री सुरेश झुरमुरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आयोजक भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष, डॉक्टर विवेक शिंदे उपस्थित होते. यावेळी श्रीमती नीलिमाताई शिंदे, श्रीमती सुषमाताई शिंदे, प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके, प्राचार्य डॉक्टर जयंतराव वानखेडे, डॉक्टर कार्तिक शिंदे, डॉक्टर विशाल शिंदे, प्राध्यापक धनराज अस्वले, दिलीप शिंदे, श्री खडसे साहेब, श्री रविंद्र शिंदे, डॉक्टर प्रिया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती व आम्ही भद्रावतीकर द्वारा आयोजित स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशन भद्रावती, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भद्रावती, सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स वाहिनी प्रसारण, सोशल मीडिया, पोर्टल न्यू क्षेत्रातील पत्रकार संघ, तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विविध समाजसेवी महिला समिती, पुरोगामी विचार मंच, सामाजिक युथ फाऊंडेशन, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व महाविद्यालय प्रबोधन समिती, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सेवानिवृत्त कर्मचारी आणि समाजातील सर्व संघटनांद्वारे  या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
              डॉक्टर विवेक शिंदे यांनी प्राध्यापक श्याम मानव यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला तसेच याप्रसंगी विविध संघटनांतर्फे प्राध्यापक श्याम मानव  यांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर विवेक शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून भारतीय लोकशाहीमध्ये असा कार्यक्रम का घ्यावा लागतो असे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अब्राहम लिंकन यांच्या लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता तयार करण्यात आलेले  राज्य म्हणजे लोकशाही होय तसेच मुठभर लोकांमुळे लोकशाहीचा विनाश होत आहे तसेच आपल्याला संविधानाने दिलेली लोकशाही टिकवायची आहे त्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मत व्यक्त केले. या वेळी सुरेश झुरमुरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,  अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व चळवळीबद्दल व कार्याबद्दल माहिती दिली. तसेच या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, एडवोकेट भूपेंद्र रायपुरे, ज्येष्ठ विधितज्ञ, भद्रावती यांनी भारतीय लोकशाही टिकावी तिचा अपऱ्हास होऊ नये त्यामुळे जीवनाचा अपऱ्हास होतो तसेच सर्वांनी संविधानाची जपवणूक करावी, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे व त्यामध्ये जगण्याची मूल्य स्थापित  होतात,  लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी पुढे यावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांना जाहीर आवाहन केले. या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते तर आभार प्रदर्शन रविंद्र तिराणिक यांनी केले. या जाहीर व्याख्यानाकरिता भद्रावती मधील प्रतिष्ठित नागरिक, सर्व पत्रकार बंधू, भद्रावती व भद्रावती परिसरातील सर्व नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अजय आसुटकर, किशोर खंडाळकर व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments