*भद्रावतीत १९ फेब्रुवारी रोजी वासवी माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा सोहळा* *महाआरतीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती*
*महाआरतीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती*
अतुल कोल्हे भद्रावती :-
येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने भद्रावती ऐतिहासिक नगरीतील कन्यका नगरी येथील वासवी माता कन्यका परमेश्वरी देवस्थानात दि.१७,१८ व १९ फेब्रुवारी रोजी कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यादरम्यान वासवी माता कन्यका परमेश्वरी व प॑चायतन मूर्तीं प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ फेब्रुवारी
रोज शनिवार ला सकाळी १० वाजता गणपती पूजन,पुण्य वाचन, प्रासादिक वास्तु पूजन,
सकाळी ११.३० वा.म॑दिर परिसरात वृक्षारोपण, सायंकाळी सहा वाजता कन्यका मातेच्या
जीवनावर आधारित स॑गीतमय
कार्यक्रम सादरकर्ते सोमेन दत्ता व
सोमा दत्ता (प. ब॑गाल). १८ फेब्रुवारी रोज रविवार ला सकाळी
९ वाजता मूर्ती अधिष्ठान पूजन व
जलाभिषेक, सायंकाळी पाच वाजता भजनी,दि॑डी, पथक ढोल
ताशासह कन्यका माता व प॑चायतन मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोज सोमवारला सकाळी ९ वाजता शैय्याधिवास उद्यापन व जलाधिवास, सकाळी
१० वाजता प्रतिमा पूजन,
सायंकाळी ४.३० वाजता प्राण
प्रतिष्ठा सोहळा व छप्पन भोग प्रसाद, सायंकाळी ६.३० ला महाआरती होणार आहे. या महाआरतीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, समाजसेविका सपना मुनगंटीवार, श्री. कन्यका नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.विजय आई॑चवार, महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार नागपूर, जय॑त बो॑गिरवार च॑द्रपूर, चंद्रपूरच्या माजी महापौर राखी क॑चर्लावार, समाजसेविका श्रद्धा कुणावार नागपूर, रश्मी को॑डावार
समाजसेविका रश्मी कोंडावार च॑द्रपूर, समाजसेविका पूजा मुनगिनवार आर्णी, भद्रावती येथील ज्येष्ठ समाजसेवक
बळव॑तराव गु॑डावार, वासवी कन्यका माता देवस्थानचे अध्यक्ष नीलेश गुंडावार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
कार्यक्रमचा लाभ आर्य वैश्य समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन वासवी माता कन्यका परमेश्वरी देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment