गारपीटाने जोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.हातात आलेले पीक गेले.

गारपीटाने जोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.

हातात आलेले पीक  गेले.

चेतन लुतडे वरोरा

               वरोरा तालुक्यातील बऱ्याच गावांना आलेल्या अचानक गारपिटामुळे तुर ,हरभरा, गहू , ज्वारी ज्वारी या महत्त्वाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 या गारपीट तथा वादळामुळे तालुक्यातील  तुमगाव, उमरी, बोरगाव, कोसरसार, साखरा, चारगाव, बेंबळा, या पट्ट्यातील  रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नितीन मत्ते, राजू चिकटे  यांनी केली आहे.  
शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज कसे फेडायचे याचा विचार शेतकरी करून राहिला आहे. 
एकीकडे हमीभाव सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला मिळालेला नाही यामध्ये पुन्हा गारपिटाने शेतकऱ्यांचे नुकसान केले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून 
येणाऱ्या दिवसात महागाई वाढेल अशी चिन्ह दिसत आहे.

नितीन मत्ते यांनी शेतकऱ्यांची कैफियत ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सहानुभूती पर शेतकऱ्यांविषयी झालेल्या नुकसान भरपाई संबंधात सोमवारला तात्काळ निवेदन सादर केले असून चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Comments