जिवाची बाजी लावून रेती तस्करी करणारे आणखी दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या गौण खणीज पथकाने पकडले**आष्टा येथील इरई नदी घाटावरील घटना*

*जिवाची बाजी लावून रेती तस्करी करणारे आणखी दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या गौण खणीज पथकाने पकडले*

*आष्टा येथील इरई नदी घाटावरील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती :-
                 भद्रावती महसूल विभागाने अवैध रेती तस्करी विरोधातील मोहीम चांगलीच तीव्र केली असून एक दिवसापूर्वी अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला पकडल्यानंतर अवैध रेती तस्करी करणाऱ्या आणखी दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही ट्रॅक्टरला तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर कारवाई तालुक्यातील आष्टा येथील इरई नदी घाटावर करण्यात आली. महसूल विभागाच्या गौण खणीज पथकाचि पेट्रोलिंग सुरु असतांना आष्टा येथील ईरई नदिघाटावर पैलतिरि रेतिचा अवैध भरणा करित असलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. सदर ट्रैक्टर पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र गौण खनिज पथकाचे तलाठी मस्के यांनी आपल्या जिवाची बाजी लावत चक्क नदीतून पोहत जाऊन पैलतीर गाठले व अवैध रेती  तस्करी करणाऱ्या दोन्ही ट्रॅक्टरला पकडले. हे दोन्ही  ट्रॅक्टर तालुक्यातील आष्टा येथील खिरटकर यांच्या मालकीचे असून या दोन्ही ट्रॅक्टरवर नंबर आढळलेला नाही. या घटनेची पुढील चौकशी महसूल विभाग करीत आहे. महसुल विभागाच्या या मोहिमेमुळे अवैध रेतीतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
winning team

Comments