अरविंदो खुल्या कोळसा खाणीतील वाहनाच्या बेलोरा गावकऱ्यांनी फोडल्या काचा**गावाच्या भूसंपादन रकमेपासून केला हंगामा : सात जनावर गुन्हे दाखल*

*अरविंदो खुल्या कोळसा खाणीतील वाहनाच्या बेलोरा गावकऱ्यांनी फोडल्या काचा*

*गावाच्या भूसंपादन रकमेपासून केला हंगामा : सात जनावर गुन्हे दाखल*

अतुल कोल्हे भद्रावती :
             अरविंदो रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड टाकळी जेना बेलोरा नॉर्थ अँड साउथ कोल माईन्स या कंपनीने सभोवतालच्या गावाचे पुनर्वसन न करता कोळसा उत्पादनाचे कार्य चालू केले. त्यामुळे येथील काही सात नागरिकांनी येथील सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करून कंपनी मधील मशीन व वाहणाच्या काचा  फोडून तोडफोड केल्याची घटना दिनांक ३ फेब्रुवारीला घडली याची तक्रार येथील सुरक्षा रक्षकाने रविवारला भद्रावती पोलिसांना दिली.
             बंटी उर्फ अनिल पंडिले वय 30 वर्षे राहणार बेलोरा याच्यासह सात प्रकल्पग्रस्त आरोपी आहे. सुभाष वाघ राहणार चोरा असे सुरक्षारक्षक फिर्यादीचे नाव आहे. अरविंदो कंपनीने या भागातील काही गावाचे भूसंपादन करण्याचे काम सुरू केले. टाकळी, जेना व बेलोरा गावाचे भूसंपादन करण्याच्या रकमेवरून या कंपनीसोबत वाद सुरू आहे. घटनेच्या दिवशी तीन मोटरसायकलवर आरोपी आले. या खाणीमध्ये प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली व येथील मशिनरी तसेच वाहनाच्या काचा फोडल्या या प्रकरणी सुरक्षारक्षकाने या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केल्याने आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे करीत आहे.

Comments