आजपासून डब्ल्यूएसएफ चषक राज्य अजिंक्यपद

*आजपासून डब्ल्यूएसएफ चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा*
वरोरा दि 31 जाने

 वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा (डब्ल्यूएसएफ)व लोकशिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पुरुष गट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लोकमान्य महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलेले आहे 
       लोकशिक्षण संस्थेमधील व्हॉलीबॉल या खेळाला 51 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल लोकमान्य महाविद्यालय, वरोरा (स्व. मनोहरभाऊ पाटील क्रीडा परिसर) येथे दिनांक 1फेब्रुवारी ते  4 फेब्रुवारी दरम्यान डब्ल्यूएसएफ चषक व्हॉलीबॉल स्पर्धा दिवस- रात्र पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेकरिता तीन मैदाने सज्ज करण्यात आलेली असून तीन मैदानावर विद्युत प्रकाश झोताची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील किमान 28 जिल्हा संघ सहभागी होतील.
         स्व. संजय जीवतोडे, स्व. ईश्वर चांदेकर, स्व. ऋषी पिदुरकर यांचे स्मरणार्थ विजेत्या संघांना चषक दिल्या जाणार असून स्व. बापूरावजी काळे, स्व. सुधाकरजी डाखरे, स्व. रवींद्रजी करमरकर, स्व. शोभाताई मत्ते, स्व. गजानन गेडाम यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट खेळाडूंना चषक दिले जाणार आहेत.
 या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री प्रशांत दोंदल यांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार असून स्पर्धेचे उदघाटन  वरोरा विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंग परदेसी ( आयपीएस) हे असणार आहे. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोडा चे अध्यक्ष  प्रा.श्रीकांत पाटील असून मुख्य पाहुणे म्हणून राजाराम बापू पाटील साखर कारखाना इस्लामपूर जिल्हा सांगलीचे चेअरमन व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष  प्रतीक जयंत पाटील हे असणार आहे. या प्रसंगी पाहुणे म्हणून वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, प्राचार्य  अशोक जीवतोडे सचिव,चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, लोकशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण  घड्याळपाटील ,वरोराच्या उप विभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, एसडीपीओ नयोमी साटम (आयपीएस), नागपूर विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी  अविनाश पुंड, मुकेश जीवतोडे शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) , डॉ. कपिल गेडाम न्यूरोलॉजिस्ट चंद्रपूर ,सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे, एक्सलंट अकॅडमीचे संचालक  अभय टोंगे, ॲड. गजानन बोढाले हे राहणार आहेत
       स्पर्धा यशस्वी करण्याकरिता वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा (डब्ल्यूएसएफ) चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, किशोर पीरके, सुनील बांगडे , मिलिंद कडवे, विनोद उमरे, राजेश मत्ते, हेमंत घिवे महाराष्ट्र वॉलीबॉल संघटनेचे सचिव विरल शहा व सर्व सहकारी प्रयत्न करीत आहेत.

Comments