भद्रावती येथील राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एआयजी क्रिकेट क्लब नागपूर विजयी**बक्षीस समारंभास भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या लोकेश मरघडेची प्रमुख उपस्थिती**60 ते 70 रणजी क्रिकेट खेळाडूंचा सहभाग*

*भद्रावती येथील राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एआयजी क्रिकेट क्लब नागपूर विजयी*

*बक्षीस समारंभास भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या लोकेश मरघडेची प्रमुख उपस्थिती*

*60 ते 70  रणजी क्रिकेट खेळाडूंचा सहभाग*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे  स्वर्गीय पंजाबराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एआयजी क्रिकेट क्लब नागपूरने व्हाईट ऍश क्रिकेट क्लब चंद्रपूरचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिले फलंदाजी करीत व्हाईट ऐश क्रिकेट क्लबने 149 धावांचे लक्ष ठेवले होते. शेवटच्या षटकात  एआयजीने विजय प्राप्त केला. स्पर्धेत एकूण 60 ते 70 रणजी खेळाडूंचा विविध संघाकडून सहभाग होता. सामने पाहण्यासाठी भद्रावती करांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
         सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते कबुतरे सोडून प्रेम तथा एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले. कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे विकेट किपर बॅट्समन लोकेश मरघडे, नागपूर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव तथा ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराचे सभापती डॉ. विजय देवतळे, लक्ष फाऊंडेशनचे सदस्य प्रशांत शिंदे, शिवसेना( उबाठा) गटाचे वरोरा - भद्रावती चे प्रमुख रविंद्र शिंदे, राष्ट्रवादीचे मुनाज शेख, डॉक्टर धनराज आस्वले, डॉक्टर कुटेमाटे, लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, सचिव सुनील महाले, भाजपाचे सुनील नामोजवार, अविनाश  पारोदे, रोहन कुटेमाटे,  समीर बल्की, नकुल शिंदे, सचिन सरपटवार, अफजल भाई व अन्य सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. 
           विजेत्या संघास दोन लाख अकरा हजार रुपये रोख व ट्रॉफी तसेच उपविजेत्या संघास एक लाख अकरा रुपये रोख व ट्रॉफी बक्षीस स्वरूपात देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज चे बक्षीस अजहर शेख ,बेस्ट बॅट्समन मनीष आऊजा ,बेस्ट बॉलर अजहर शेख, बेस्ट विकेटकीपर ऋषी नाथानी , बेस्ट फिल्डर अनिरुद्ध, मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना अनिरुद्ध अशा प्रकारे व्यक्तिगत बक्षीस देण्यात आली. अंपायर म्हणून मोहम्मद फारूक कुरेशी व अमन श्रीवास्तव तसेच कॉमेंट्रीटर परवेज राजा, इजाज सर व स्कोरर प्रशिक लांडगे उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ते 18 फेब्रुवारी पर्यंत पिपराडे मैदान चंद्रपूर - नागपूर रोड येथे करण्यात आलेले होते.
                 या स्पर्धेत देशातील जबलपूर, लखनऊ, इटावा, बेंगलोर तेलंगणा तसेच राज्यातील जळगाव, नागपूर ,चंद्रपूर येथील नामांकित क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.  यामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा  समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन सचिन सरपटवार तर आभार संदीप शिंदे यांनी मानले.
           या संपूर्ण स्पर्धेसाठी लक्ष फाउंडेशनचे प्रशांत शिंदे, अध्यक्ष संदीप शिंदे, रोहन कुटेमाटे, सुनील महाले, समीर बलकी, नकुल शिंदे, सचिन सरपटवार, प्रदीप खंगार, सुयोग बल्की, सुहास वाढई, सतीश कवराती, कामरान खान, मिलिंद ठाकरे, शुभम निरगुडवार, विनायक माडोत, निखिल कुत्तरमारे, अजित अवतारे, शाहिद शेख, कुंदन चौधरी, सौरभ राव, यश थूल, केतन तिडके, श्रेयस, गोलू, हर्षल यांनी परिश्रम घेतले.

भारतीय दिव्यांग क्रिकेट खेळाडू लोकेश मरघडे यांची उपस्थिती

बक्षीस वितरण प्रसंगी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे खेळाडू लोकेश मरघडे प्रामुख्याने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यांची निवड करण्यात आली होती. हा सामना भारताने तीन - दोन ने जिंकला होता. सामन्या दरम्यान प्रभावित होऊन इंग्लंडच्या जॉर्ज बटलरने आपली स्वतःची कीपिंगची किट लोकेश यांना दिली होती. लोकेश मरगडे यांची उपस्थिती नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरली.

Comments