खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

श्री गुरुदेव सेवा मंडळ कचराळा वतीने ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा सुवर्ण महोत्सवी पुण्यस्मरण सोहळा तथा सर्व संत स्मृती मानवता दिन समारोह*


*श्री गुरुदेव सेवा मंडळ कचराळा वतीने ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा सुवर्ण महोत्सवी पुण्यस्मरण सोहळा तथा सर्व संत स्मृती मानवता दिन समारोह*


वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भद्रावती तालुक्यातील कचराळा या गावी वंदनीय ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्तिथी  कार्यक्रम सोहळा पारपडला असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख, माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, संस्थापक श्रीनिवासराव शिंदे मेमोरिबल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट  चे रविंद्र शिंदे होते. प्रमुख उपस्थित भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा भद्रावती विधानसभा  उपजिल्हाप्रमुख  भास्कर ताजने, विजय भाऊ चिंताडे, महादेवराव मोहितकर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परमेश्वरची ताजने, संतोष मारोतराव ताजणे, आशिष ईश्वर ताजने, उज्वला ताई खेडकर मुख्याध्यापिका शाळा कचराळा,सरपंच सौ सीमा मनोज कुळमेथे, उपसरपंच छत्रपती अण्णाजी एकरे, सौ सुनीता बंडू चौधरी ग्रामपंचायत सदस्य, सौं.पुष्पा मधुकर येरगुडे ग्रामपंचायत सदस्य, सचिन नमेश्वर माऊलीकर ग्रामपंचायत सदस्य, जगन विठ्ठल पायताडे ग्रामपंचायत सदस्य, सूर्यभान सदाशिव येरगुडे अध्यक्ष तंटामुक्ती समिती, भाग्यश्री ताई मंगेश येरगुडे पोलीस पाटील, राकेश जनार्दन येरगुडे,यशवत वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य, कार्यक्रमाला सर्व गुरुदेव भक्त आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव येरगुडे, उपाध्यक्ष मधुकर येरगुडे,सचिव भैय्याजी बोबडे, कोष्याध्यक्ष मंगेश येरगुडे, सेवा अधिकारी कपिल झाडे ल, प्रचार प्रमुख महादेव सोमलकर, सचिव विजय माथनकर  व सदस्य आणि समस्त ग्रामवासी जनता जनार्दन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संपूर्ण नियोजन करून कार्यक्रम अतिशय शिस्त पद्धतीने पार पाडला.




Comments