वरोरा येथे पुलाच्या कामासाठी खड्डा उघडा ठेवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी; विभाग व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

वरोरा येथे पुलाच्या कामासाठी खड्डा उघडा ठेवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी;  विभाग व कंत्राटदारावर कारवाईची मागणी वरोरा, (२७/३/२६): सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बोर्ड ते पावना या मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर उघडा ठेवलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने हा अपघात झाला. जखमी तरुणांवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली असून, एकाच्या डोक्याचे ऑपरेशन बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाश येकांजी बारसागडे (वय २९, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास ते त्यांचे मित्र अंकित गजानन करडभूजे (वय २७) व गोपाल पुरुषोत्तम विरुटकर हे तिघे दुचाकी (क्र. एम.एच. ३४ बीएक्स ४४९४) ने आगरा येथून परत येत होते. अंधार असताना पुलाच्या कामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा बंधारे नव्हते. फक्त पांढरी पट्टी होती, मात्र तीही व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे पुढे मोठा खड्डा असल्याचे ...

आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे स्पर्धेत भद्रावती येथील चार कराटेपटूंना आठ सुवर्णपदके**आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारत, जपान, मलेशिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका व इटली या सहा देशातील 2500 कराटेपटूंचा सहभाग*

*आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे स्पर्धेत भद्रावती येथील  चार कराटेपटूंना आठ सुवर्णपदके*

*आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारत, जपान, मलेशिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका व इटली या सहा देशातील 2500 कराटेपटूंचा सहभाग*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
              मुंबई येथील अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आजाद नगर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे कप स्पर्धेत भद्रावती शहरातील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या चार कराटे पटुंनि नेत्रदीपक खेळ सादर करीत आठ सुवर्णपदके प्राप्त केले आहे.
             या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारत, जपान, मलेशिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका व इटली या सहा देशातील 2500 कराटेपटूंचा सहभाग होता. सदर स्पर्धेत हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या दामिनी सूर्यवंशी हिने ओपन चॅम्पियनशिप मध्ये फाईट तथा कातास या प्रकारात दोन सुवर्णपदके, साची चावरे हिने 20 किलो वजन गटात फाईट व कातास प्रकारात दोन सुवर्णपदके, साक्षी कपाट हिने 30 किलो वजन गटात फाईट व कातास प्रकारात दोन सुवर्णपदके तर सोनाक्षी कोंडस्कर हिने 25 किलो वजन गटात फाईट व कातास प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली. या चारही कराटे पटुंनि आठ सुवर्णपदके प्राप्त करून या स्पर्धेत क्लबचे व भद्रावती शहराचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल चारही कराटेपटूंचे शहरात कौतुक होत असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक गुरु शियान राकेशदीप, सिंहान शितल तेलंग, मास्टर संदीप चावरे व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.

Comments