राज्यस्तरीय दिव्यांग विशेष ऑलिंपिक स्पर्धेत भद्रावतीतील दोन विद्यार्थ्यांचे यश**सुजल भीमलवार राज्यातून दुसरा तर केतन बारेकर राज्यातून तिसरा**ऑलिंपिक स्पर्धेतील 100 मीटर धावण्याची स्पर्धा*

*राज्यस्तरीय दिव्यांग विशेष ऑलिंपिक स्पर्धेत भद्रावतीतील दोन विद्यार्थ्यांचे यश*

*सुजल भीमलवार राज्यातून दुसरा तर केतन बारेकर राज्यातून तिसरा*

*ऑलिंपिक स्पर्धेतील 100 मीटर धावण्याची स्पर्धा*
 अतुल कोल्हे भद्रावती :-
                 नागपूर येथील आरटीएम मैदानावर पार पडलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय विशेष ऑलम्पिक स्पर्धेत भद्रावती येथील गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयातील सुजल रवींद्र भीमलवार या विद्यार्थ्याने 12 ते 15 वयोगटातील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यातून दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर शहरातील महाकाली निवासी मतिमंद मुला मुलींची कर्मशाळा विद्यालयातील केतन चंपत बारेकर या विद्यार्थ्याने 22 ते 29 या वयोगटातील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यातील एकूण सहाशे दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या राज्यातस्तरीय स्पर्धेत 11 विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाचपोर, मुख्याध्यापक चेतन पाचपोर व शाळेतील शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments