आनंदवनात 10 फरवरीला बाबा आमटे राष्ट्रीय जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार व बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण*

*आनंदवनात 10 फरवरीला बाबा आमटे राष्ट्रीय जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार व बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण* 
 वरोडा : शाम ठेंगडी
           थोर समाजसेवक श्रद्धेय बाबा आमटे यांच्या भारत जोडो सायकल अभियानातील युवक युवतींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मदुराई येथील आर सुंदरसेन यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मध्यप्रदेशातील राजकुमार सिन्हा देण्यात येत असल्याची माहिती बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टचे सचिव डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
      आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात बाबा आमटे यांच्या नऊ फरवरीला असलेल्या स्मृती दिनाचे औचित्य साधत 10 फरवरी रोज शनिवारला सकाळी 11 वाजता एकता अभियान समितीच्या वतीने होणाऱ्या समारोहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महारोगी सेवा समितीचे कार्यकारी विश्वस्त तसेच एकता अभियान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात कलकत्ता येथील सामाजिक कार्यकर्ते व भारत जोडो अभियानाचे पूर्वांचल विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ओ.पी. शहा यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले नागपूरचे मेंदू विकार तज्ञ व जागतिक मेंदू विकार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
          यावर्षीचा बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी तामिळनाडूतील मदुराई येथील आर सुंदरसेन हे ठरले आहेत.एक लाख रुपये रोख,सन्मानपत्र व सन्मानचित्र चिन्ह असे या जीवन गुरव गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.सुंदरेसन यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष करून अन्नसुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता व आपातकालीन व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण इत्यादी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. बाबा आमटे यांनी 1985-86 या सालात काढलेल्या  कन्याकुमारी ते काश्मीर व 1988-89 या सालात काढलेल्या इटानगर ते ओखा या दोन्ही सायकल यात्रेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.
     बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार हा यावर्षीपासून पहिल्यांदाच देण्यात येत असून हा पुरस्कार मध्यप्रदेशातील जबलपूर परिसरातील वर्णी धरणामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी मागील 35 वर्षापासून संघर्ष व रचनात्मक कार्य करणारे राजकुमार सिन्हा यांना देण्यात येणार आहे. भारत जोडो अभियानात 1989  अरुणाचल ते गुजरात या सायकल यात्रेत त्यांनी सहा हजार किलोमीटरचा प्रवास केला. बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप 51 हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
             या कार्यक्रमाला परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला डॉक्टर विकास आमटे, ट्रस्टचे सदस्य शकील पटेल,गिरीश पद्मावार हे उपस्थित होते.

Comments