भद्रावती तालुक्यात इतिहास घडणार : तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर वर्ग १० वी चे वर्गमित्र येणार सहकुटूंब एकत्रीत*
*भद्रावती तालुक्यात इतिहास घडणार : तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर वर्ग १० वी चे वर्गमित्र येणार सहकुटूंब एकत्रीत*
*जेना येथे माजी विद्यार्थांचा स्नेह मिलन सोहळा*
*बैठकीत उपस्थित १०वी चे वर्गमित्र*
अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील जेना येथील कर्मवीर विद्यालयात दि. २ फेब्रुवारी २०२४ रोज शुक्रवारला अकरा वाजता माजी विद्यार्थांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त याच विद्यालयात शैक्षणिक सत्र १९७९-८० मध्ये वर्ग १० मध्ये शिक्षण घेतलेले सर्व वर्गमित्र तब्बल त्रेचाळीस वर्षा नंतर सहकुटूंब एकत्रीत येणार आहे. हा स्नेह मिलन सोहळा भद्रावती तालुक्यात एक इतिहास घडविणार असल्याचे या निमित्य बोलल्या जात आहे.
दि. २९ जानेवारी २०२४ रोज सोमवारला सदर मेळावा आयोजनासंबधी स्धानिक रहिवासी अशोक देहारकर यांच्या घरी नुकतीच अंतीम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विजय दोडके उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाकर वाघ, अशोक देहारकर,सुर्यभान पिंपळकर, राजेंद्र मोदी, भाऊराव ठेंगणे, सुधाकर बोढाले, उत्तम शिरपूरकर, नंदकुमार कायरकर, शामराव कायरकर , पोमेश्वर टोंगे आणि आशिष देहारकर प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुर्यभान पिंपळकर यांनी केले.
दि. २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळ्यात वर्ग १०वी शैक्षणिक सत्र १९७९-८० च्या बॅचचे तत्कालीन गुरुवर्य पुंडलीक नन्नावरे, विठ्ठल रोडे आणि मारोतराव खिरटकर यांचा सत्कार करण्यात येईल. या निमित्याने शैक्षणिक रॅली, माजी विद्यार्थांसाठी तासीका, मान्यवरांचे मार्गदर्शन , माजी विद्यार्थांचे मनोगत आणि तत्कालीन गुरुवर्य आणि माजी विद्यार्थी यांचा सुसंवाद आदि उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक तथा राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक ना.गो. थुटे, उद्घाटक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य आतिथी वृन्द उपस्थित राहतील.
Comments
Post a Comment