बुढालपेन सेवा संस्थान या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन सुरू आहे.

केंद्र व राज्य सरकारने आदिवासी समाजाला पीक कर्जाशिवात इतरही कर्ज उपलब्ध होण्यास कायदे बनवावे : रविंद्र शिंदे

तालुक्यातील घोसरी या गावात बुढालपेन सेवा संस्थान या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन सुरू

वरोरा
चेतन लुतडे

आदिवासी समाज हा देशातील समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. आदिवासी बांधवांच या देशासाठी मोठ योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात आजही आदिवासी समाजाच्या अनेक समस्या तशाच आहेत. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व इतर कामासाठी कोणतीही वित्तीय संस्था कर्ज उपलब्ध करून देत नाही. आदिवासी शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय कोणतेही कर्ज मिळत नाही. यावर केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आदिवासी समाजाला पूरक नविन कायदे तयार केले पाहिजे. आदिवासी बांधवांनी कोणत्याही नेत्याच्या हातचे बाहुले बनायला नको. केवळ वोटबँक म्हणून या समाजाचा वापर व्हायला नको तर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी सर्वांगीण प्रयत्न व्हायला हवे, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी काल (दि.७) ला येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.
तालुक्यातील चंदनखेडा, मुधोली जिल्हा परिषद गटातील घोसरी या गावात बुढालपेन सेवा संस्थान, घोसरी या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन दि.6 जानेवारी पासून सुरू झाले आहे.

संमेलनाअंतर्गत ग्रामसफाई, सल्ला शक्तिस्थान, सागा समोर हळदी टिका, क्रांतिवीर बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन, गोंडी भजन, आदी कार्यक्रम सुरु आहेत.

काल रविवारी (दि. ७ जानेवारीला) रात्री ७ वाजता गोंडी पारंपरिक नृत्य, रेकॉर्डिंग व सामूहिक गोंडी नृत्य स्पर्धा होती. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे  संस्थापक रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरपरिषद भद्रावतीचे माजी नगरसेवक  नरेंद्र पढाल, तालुका युवा सेना अधिकारी राहुल मालेकर, गोंडियन आदिवासी नेता विलास परचाके, वनरक्षक निरंजन धुळे, वनरक्षक सौ. ममता सोयाम, अथर्व अमर कुडमेथे, दिवाकर पेंदाम, वनरक्षक मधुकर कोवे, वगारे, पोलीस पाटील भानुदास
कुडमेथे, वडाळा ग्रामपंचायत सदस्य रवी आत्राम व संपूर्ण गावकरी मंडळी तथा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. सामाजिक प्रबोधन, आरोग्य, शैक्षणिक दत्तक आदी योजना समजून सांगितल्या. कोणतीही समस्या असेल तर ट्रस्टच्या कार्यवाहकांना भेटा आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल व जीवन जगताना  आत्मविश्वासाने जगा येणाऱ्या समस्यांना पराजित होवून चालणार नाही. समस्यांचा सामना करण्यास शिका. असे मार्गदर्शन केले.


Comments