निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा बातमी: वरोरा : निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या निकृष्ट रस्त्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांत उखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकार तर्फे ठेकेदारा मार्फत रोड बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम करण्यात येत असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डांबराऐवजी वेस्टेज ऑईलचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या प्रकाराला “बनावट विकास” असे संबोधले आहे. रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे की, तो हातानेही उखडला जात असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. दरम्यान, या रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनामध्ये साटेलोटे असल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे...

नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी कामगारांच्या चेहऱ्यावर फूलले हास्य*

 नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने  नारायणी सन्स इंडिया प्रा . लि . कंपनी कामगारांच्या चेहऱ्यावर फूलले हास्य*

भद्रावती
 शिवसेना नेते किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार  नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी स्थानिकांच्या रोजगार व वेतनाच्या मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब यांना निवेदन देऊन कर्नाटका एम्टा बरांज माईन्स मधील नारायणी सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कामगारांचा होत असलेल्या शोषणाबाबत कामगारांना मागील 80 दिवसापासून न दिलेल्या पगाराबाबत निवेदन सादर केले .जवळपास 125 कामगारांचे मागील 80 दिवसापासून वेतन कंपनीकडे थकीत आहेत यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन कामगारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे .त्यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची अतोनात अवहेलना होत आहे . याची दखल घेऊन माननीय नितीन मत्ते यांनी कंपनीने कामगारांचे वेतन तत्काळ देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंपनी विरोधात यलगार केला व कंपनीने तत्काळ २०/०१/२०२४ ला कामगारांच्या खात्यावर त्यांचा पगार जमा केला . यामुळे कंपनीच्या कामगारा मध्ये आनंदाचे वातावरण व नितीन मत्ते यांचे बद्दल आदरभाव ओसंडून येत होता सर्व कामगारांनी श्री नितीन मते यांचा भव्य सत्कार करण्याचा मानस बोलून दाखविला .

 यावेळी श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, पंढरी एकरे, रियाज शेख, मनिष मडावी, मनोज परचाके, आनंद राजूरकर, संदिप डाहूले, अभय बोढाले, धिरज कूचनकर, तरबेज सिद्दीकी, नूर खांन, योगेश काकडे व कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Comments