मतदानाच्या अधिकारामुळे देशाची लोकशाही बळकट होते प्राध्यापक डॉ. कुंदन सहारे
भद्रावती - अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके तर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर कुंदन शहारे व प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे, प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे, प्राध्यापक डॉक्टर अजय दहेगावकर व या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश हजारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलण व पाहुण्यांच्या स्वागताने झाली. याप्रसंगी प्रा डॉ राजेश हजारे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून राष्ट्रीय मतदार दिन का साजरा करतात या मागचे उद्देश स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ कुंदन सहारे यांनी भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार त्यामुळे देशाचे लोकशाही बळकत होते. तसेच तरुणांनी मतदानाविषयी जागरूक असणे आवश्यक आहे कारण लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क व कर्तव्य आहे असे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा डॉ अजय दहेगावकर यांनी संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आहे त्यामुळे आपण प्रत्येकाला मतदान करावे तसेच संविधानातील मतदानाविषयी सखोल माहिती दिली. आज शंभर टक्के मतदान होणे काळाची गरज आहे त्यामुळे आपली, समाजाची, राज्याची व देशाची प्रगती होते असे आपले मत व्यक्त केले.
यानंतर राष्ट्रीय मतदार दिन या विषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यामध्ये आचल तेलतुंबळे, ऐश्वर्या झिलपे, प्रांजली मून, जानवी ठेंगे, तेजस्विनी आंबीलकर व निकिता बिबटे या विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी आंबीलकर तर द्वितीय क्रमांक आचल तेलतुंबळे व तृतीय क्रमांक ऐश्वर्या झिलपे हिचा आला. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल एस लडके यांनी सर्व विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करणे काळाची गरज आहे व मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व सर्वांनी मतदान करून देशाला चांगले प्रतिनिधी देऊन आपला देश जागतिक महासत्ता बनविणे व देश बळकट होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तसेच जागरूक मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे विद्यार्थ्यांना आवाहन केले तसेच योग्य व्यक्तीला निवडून दिले पाहिजे असे आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ राजेश हजारे तर आभार प्रदर्शन प्रा शशिकांत शित्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रा संदीप प्रधान, प्रा देवानंद भवरे श्री शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment