भवरलाल चौधरी तर्फे राजस्थानच्या खेळाडूंचा सत्कार*

* भवरलाल चौधरी‌ तर्फ राजस्थानच्या खेळाडूंचा सत्कार*
वरोडा: शाम ठेंगडी सर

               बल्लारपूर येथीलअद्यावत क्रीडा संकुलावर पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय  मैदानी स्पर्धेत राजस्थानच्या मुलींनी नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल त्यांचा वरोडा येथील जाट समाजातर्फे 31 डिसेंबर रोज रविवारला सत्कार करण्यात आला.
    येथील आलिशान लॉन्स येथे आयोजित एका कार्यक्रमाला भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे, रमेश राजूरकर, काँग्रेसचे डॉक्टर हेमंत खापणे, वरोड्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, खेळाडूंचे प्रशिक्षक रामविलासजी साहू , नागपूर येथील जाट समाजाचे अध्यक्ष प्रभुजी खिचड ,माजी सैनिक गुलाबराव जीवतोडे,योग पटू महेश जाखोटिया अतिथी म्हणून उपस्थित होते.
     बल्लारपूर येथील अद्यावत क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत राजस्थान येथील हिरावती या 2500 लोकसंख्येच्या छोट्याशा गावातील वसुंधरा खिलेरी, सुशीला प्रजापत व कविता डुडी या मुलींनी नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल येथील भवरलाल लक्ष्मण चौधरी यांनी पुढाकार घेत जाट समाजातर्फे त्यांचा सत्कार आयोजित केला होता.    
      वसुंधरा खिलेरी हिने पोल वॉल्ट स्पर्धेत रौप्य पदक, कविता डुडी हिने 3000 मीटर रेस वॉक मध्ये ब्रांझ पदक तर सुशीला प्रजापत हिने 3000 मीटर दौड मध्ये चौथे स्थान पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 
           यावेळी बोलताना मान्यवरांनी या मुलींनी राजस्थानचेच नाव उंचावले नाही तर यांच्यात भविष्यात भारताचे नाव उंचावण्याची क्षमता आहेत.त्यांनी देशाचा गौरव व देश हितासाठी खेळले पाहिजे  अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. 
     यावेळी बोलताना त्यांचे प्रशिक्षक राम विलास साहू यांनी चंद्रपूर,गडचिरोली या जिल्ह्याबद्दल जी माहिती होती तशी वस्तुस्थिती नसून प्रत्यक्षात येथील चित्र वेगळे दिसले. येथील स्टेडियम उच्च प्रतीचे असून येथील निवास व भोजनाची व्यवस्था उत्कृष्ट असल्याची माहिती देत इथून आपण चांगल्या आठवणी घेऊन आपण जात असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
       यावेळी भवरलाल चौधरी, हिराचंद ठाकूर यांनी प्रत्येकी 11000 रूपये, जेठालालजी डुडिया यांनी 14500 रुपये तर रमेश राजूरकर यांनी 5100 रूपये खेळाडूंना भेटी दाखल दिले.
            कार्यक्रमाचे संचलन दर्शन जाकोटिया याने उत्कृष्ट पणे केले. भवरलाल चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विशद केली.या कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक व जात बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments