राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी सौ रंजना पारशिवे तर सौ अर्चना बुटले यांची चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड*

*राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी सौ रंजना पारशिवे तर सौ अर्चना बुटले यांची चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड*

वरोरा
चेतन लुतडे 

 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांनी सौ रंजना पारशिवें यांची चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी व सौ अर्चना बुटले यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्न शील राहून पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य जनते पर्यंत पोचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

चंद्रपूर शासकिय विश्रामगृह येथे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते सौ रंजना पारशिवे व सौ अर्चना बुटले या दोघांनाही नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राजीव कक्कड, सौ चारुशीला बारसागडे, विलास नेरकर, उल्हास करपे, आबीद अली, सुनिल काळे, संतोष देरकर, महेंद्रसिंग चंदेल, रमेश कराळे, मंगेश पोटवार, रवींद्र भोयर, सुरेश हेमके,जहिर खान, सुजीत उपरे, अभिनव देशपांडे यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments