खोदकाम करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यापासून वेतन नाही* *शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी व्यक्त केला रोष*

*खोदकाम करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यापासून वेतन नाही* 

*शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी व्यक्त केला रोष*
वरोडा : श्याम ठेंगडी सर
        भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा या खाणीतील कोळश्याचे खोदकाम करणाऱ्या केपीसीएल अंतर्गत नारायणी सन्स इंडिया प्रा.लिमीटेड ही कंपनी  मातीचे खोदकाम करते.  खोदकाम व माती ची वाहतूक करण्यासाठी या कंपनी या कंपनीत अंदाजे 125 मजूर कार्यरत आहेत या कंपनीने आपल्या मजुरांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन दिलेले नसल्याने या मजुरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन शिंदे यांना कळताच त्यांनी या मजुरांची भेट घेतली व परिस्थिती जाणून घेतली. दोन महिन्यापासून या मजुरांना पगार नसल्यामुळे यांचेवर व त्यांच्या मुलाबाळांवर उपासमारीची पाळी आली असून मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सदर कंपनीने त्वरित  मजुरांना वेतन द्यावे अशी मागणी करत या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी नितीन शिंदे यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे

Comments