राजकीय हेतू बाजूला ठेवून एकत्र यावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननराव बोढाले
धनाजे कुणबी समाजाच्या राज्यस्तरीय उपवर वधू वर परिचय मेळाव्यात हजारो युवकाची नोंदणी.
वरोरा : आज समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता समाजातील सर्व नागरीकांना सोबत येणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी धनोजे कुणबी समाजाद्वारा आयोजित राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
वरोरा तालुका धनोजे कुणबी समाज द्वारा दि. 27 जानेवारी 2024 रोजी धनोजे कुणबी सभागृह वरोरा येथे राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननराव बोढाले, उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. यावेळी आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी मत व्यक्त करतांना सांगितले की आजच्या युगात प्रत्येक समाजाने आपला विकास साधने गरजेचे आहे. हा विकास साधण्यासाठी आपण देखील एकत्रीत येणे गरजेचे आहे. भविष्यात समाजाच्या विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वधु-वर परिचय मेळाव्यातून भविष्यातील योग्य जोडीदार निवडून सुखी संसाराचे स्वप्न पुर्ण करावे, असे मत देखील यावेळी व्यक्त केले. अलीकडच्या धावपळीच्या युगात मुला-मुलींचा शोध कठीण असून या मेळाव्याच्या निमित्ताने समाजाने एक संधी निर्माण केली असल्याचे आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.
यावेळी मंचावर विधान परिषदेचे आमदार सुधाकरराव अडबाले, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे त्यासोबतच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी इतर मान्यवरांनी देखील आपले मत व्यक्त करत समाजाप्रती आपण देणं लागत असल्याची भावना व्यक्त केली.
राज्यस्तरीय धनोजे कुणबी समाज उपवर परिचय मेळाव्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू देऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य मदनराव ठेंगणे,सचिन जिवतोडे सचिव , वसंत चवले कोष्याधक्ष, नरेंद्र लांबट, वसंत कुरेकार, अभय ठावरी, रामचंद्र नागपुरे, अभिजित कुरेकार, मुकुंद जोगी, जयदेव आसेकर, दुष्यंत ताजने, अमित आसेकर, संभाजी पारोधे, गजानन पाचभाई व समाजातील युवकांनी अथक प्रयत्न केले.
Comments
Post a Comment