माजरी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाणवाटप**वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन*

*माजरी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाणवाटप*

*वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन*

*उपतालुका प्रमुख तथा सदस्य ग्रामपंचायत मांजरी रवी भोगे, माजरी प्रमुख रवी राय, विभाग प्रमुख बंडूभाऊ मांढरे, प्रमोद ढगे यांचे नियोजने*

मांजरी
               भद्रावती तालुक्यातील स्थानिक माजरी शहरात शिवसेनेतर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाण वाटप कार्यक्रम भरगच्च महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज (दि.२9) ला संपन्न झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या रश्मी उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना नेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनातून, चंद्रपुर-आर्णी लोकसभा निरिक्षक कामगार नेते माजी नगरसेवक शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांचे निरीक्षणात, शिवसेना उपनेत्या शितल सेठ देवरुखकर, पुर्व विदर्भ सघंटीका प्रा. शिल्पा बोडखे यांच्या संकल्पनेतून, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेड़े, चंद्रपुर जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृ.उ.बा.स. सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक नरेंद्र पढाल, युवती सेनेच्या प्रतिभा मांडवकर, भद्रावती, युवासेना अधिकारी रोहण कुटेमाटे, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, भद्रावती तालुका महिला संघटीका आशा ताजने, सुषमा शिंदे माजी नगसेविका, माजरी संघटिका गायत्रीताई यमलावार उपतालुका संघटिका शीला आगलावे यांच्या सहभागाने वंदनीय हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८०% समाजकारण व २०% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 75 वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहमिलन सोहळा तसेच मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा, चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे, या हेतूने स्नेहमिलन हळदीकुंकू व वाण वाटप कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता हे प्रतीक असलेले माजरी  शहरात संपन्न झाला. 
               या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा महिला संघटिका नर्मदा बोरेकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक युवासेनेचे पूर्व विदर्भ सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख भास्कर पाटील ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक नंदू पढाल, जिल्हा कामगार सेना सचिव अमोल मेश्राम, भद्रावती तालुका संघटिका आशा ताजने, उपतालुकाप्रमुख तथा माजरी ग्रामपंचायत सदस्य रवी भोगे, माजरी शहर प्रमुख रवी राय, माजी नगरसेविका सुषमा शिंदे आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम स्थळी प्रमुख आकर्षण ठरलेल्या लहान मुला-मुलींनी उत्कृष्ठ असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती महिला आघाडी तर्फे कलाकारांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरीता कलाकारांचा सन्मानसुध्दा करण्यात आला.
              सदर कार्यक्रमामध्ये महिला संरक्षण व महिलांनी लघुउद्योग उभारून स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले सोबतच उपस्थित महिलांना स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या सुरु असलेल्या योजना सुद्धा समजावून सांगण्यात आल्या व सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
हळदी-कुंकु कार्यक्रमामध्ये माजरी स्थानिक रहिवासी अब्दुल सईद शेख, श्रीशैलम जिल्लाला यांना कॅन्सर उपचाराकरीता तसेच रोशन मेश्राम व रिंकु गुप्ता यांनासुध्दा ट्रस्ट तर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले. सदैव महिलांचा मान-सन्मान त्यांच्या अडी-अडचणी मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिलांच्या  पाठीशी सदैव उभी राहील, असे जाहीररित्या विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी मार्गदर्शनात सांगीतले. 
या कार्यक्रम प्रसंगी उपजिविकेकरीता शिलाई मशीन मिळावी याकरीता मयुरी ढवस, चंदा गोंडे यांनी विनंती अर्ज दिला सोबतच दिव्यांग असलेले सब्बु इवनाती, जीशांत पप्पू खान, संतोष नरवडे, गणेश पेंदोर, गौरव चटप यांनी तीनचाकी सायकलकरीता विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना अर्जाव्दारे विनंती केली. यावर रविंद्र शिंदे यांनी लवकरात लवकर गरजुना साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास आलेल्या महिला भगीनी यांचे स्वागत शोभा चंदनखेडे, राणी तोटा, उर्मिला प्रसाद, उषा गौतम, मधू ठाकूर, चंदा वेले, सुषमा रामटेके, रुचिता ढगे, वैशाली पिंपळकर यांनी केले. महिला आघाडी भद्रावती पदाधिकारी शीला आगलावे यांचा वाढदिवस असल्यामुळे उपस्थितांनी शुभेच्छा देत निरोगी आयुष्याकरीता शुभाशिष दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता महिला आघाडी व युवती सेना पदाधिकारी माया टेकाम, नेहा बन्सोड, शिला आगलावे, मंजुषा खापने यांनी सहकार्य घेतले सोबतच प्रमुख्याने महिला भद्रावती कृ.उ.बा.स. संचालक कान्होबाजी तिखट, पदाधिकारी बंडु मांढरे, विजय खंगार, रवि इंगोले तसेच उपशहर प्रमुख चंद्रहास राम, शाखा प्रमुख विवेक सुर्यवंशी, मो. अंसार खान, सुनिल राजपुत, राजु प्रजापती, राकेश तोटा, प्रमोद ढगे, चंदा गोंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. सोबतच सदानंद दासारपु, सुरेश वर्मा, रवि निषाद, राजा खान, नितिन जाधव, बबीता जगनाके, माला महातळे तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवतीसेना पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भद्रावती तालुका महिला संघटिका आशाताई ताजणे यांनी केले व कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गायत्री यामलावार यांनी केले. हळदी-कुंकु, वाण वाटप व स्नेहमिलन कार्यक्रम माजरी येथील महिला मंडळीच्या भरगच्च उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.

Comments

Post a Comment