*भद्रावती शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाणवाटप*
*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व व चंद्रपुर जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांचा पुढाकार*
*माजी नगरसेविका श्रीमती चंद्रकला ताई पारोधे, सौ. पुष्पाताई ताटेवार, डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांनी केले मार्गदर्शन*
भद्रावती :
स्थानिक श्री मंगल कार्यालय येथे शिवसेनेतर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाण वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात आज (दि.२६) ला पार पडला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेत्या सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना नेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनातून प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या संकल्पनेतून, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेड़े यांच्या निरीक्षणात, जिल्हा महीला संपर्क प्रमुख सौ. सुषमाताई साबळे, चंद्रपुर जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर यांच्या पुढाकाराने, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांच्या नेतृत्वात, तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक नरेंद्र पढाल, युवती सेनेच्या प्रतिभा मांडवकर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. आश्लेषा जीवतोडे (भोयर), भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना अधिकारी रोहण कुटेमाटे, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, भद्रावती तालुका संघटिका आशाताई ताजने, शहर संघटिका मायाताई टेकाम, समन्वयक सौ. भावनाताई खोब्रागडे, उपतालुका संघटिका शीलाताई आगलावे यांचे सहभागाने वंदनीय हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८०% समाजकारण व २०% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यातील ७५, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्नेहमिलन सोहळा व मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत राहावा, चांगल्या विचाराचे आदान प्रदान व्हावे, या हेतूने स्नेहमिलन हळदीकुंकू व वाण वाटप कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा महिला संघटिका सौ. नर्मदाताई बोरेकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक युवासेनेचे पूर्व विदर्भ सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख भास्कर पाटील ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक नंदू पढाल, माजी नगरसेविका श्रीमती चंद्रकला ताई पारोधे, सौ. पुष्पाताई ताटेवार, डॅा. सौ. प्रियाताई शिंदे, प्रा.सौ. उज्वला जयंत वानखडे, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती माजी सैनिक कॅप्टन विलास देठे, माजी सैनिक विजय तेलरांधे, वरोरा-भद्रावती विधानसभा संघटक तथा नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशांत भाऊ कारेकर, माजी नगरसेविका श्रीमती सुषमाताई शिंदे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये महिला संरक्षण व महिलांनी लघुउद्योग उभारून स्वतःच्या पायावर उभे व्हावे, असे मार्गदर्शन करण्यात आले असून महिलांना स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या योजना सुद्धा समजावून सांगण्यात आल्या.
कार्यक्रमांमध्ये स्थानिक गौतम नगर येथील रहिवासी राकेश कांबळे यांना कॅन्सर असल्यामुळे त्यांना ट्रस्ट तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. तसेच सदैव महिलांचा मान-सन्मान त्यांच्या अडीअडचणी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या पाठीशी उभी राहील, असे जाहीर रित्या सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भद्रावती तालुका महिला संघटिका सौ. आशाताई ताजणे यांनी केले व कार्यक्रमाचे संचालन सौ. सरलाताई मालोकर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भद्रावती तालुका महिला संघटिका आशाताई ताजणे, भद्रावती शहर संघटिका सौ मायाताई टेकाम, उपतालुका संघटिका सौ. शीलाताई आगलावे, मनीषाताई जुनारकर, उपशहर संघटिका, वर्षाताई आत्राम उपशहर संघटिका, कु. शिव गुडमल, उपजिल्हा अधिकारी युवतीसेना वरोरा विधानसभा, सौ. कनिष्का घनश्याम आस्वले, विधानसभा संघटक, वरोरा विधानसभा युवतीसेना, आशाताई चौधरी उपशहर संघटिका, रंजना विनोद बावणे वीरपत्नी, मनीषा डोंगरे वीरपत्नी, सूर्या सावसाकडे वीरपत्नी, सुरेखा पवार रंजनाताई डंभारे, सौ. सुनंदाताई डुकरे, सौ. निर्मलाताई प्रशांत कारेकर, सौ. माला दास गुप्ता, सौ. सविता सतीश वरखडे तथा समस्त पदाधिकारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महिला आघाडी, चंद्रपूर जिल्हा (वरोरा चिमूर ब्रह्मपुरी) यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment