कामगारांनी सदैव संघटित असणं ही काळाची गरज आहे - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख*

*कामगारांनी सदैव संघटित असणं ही काळाची गरज आहे - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख*

*नारायणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी नितीन मत्ते  यांचा सदृदयी सत्कार समारंभ हनुमान मंदिर बरांज येथे केला ज्या नारायणी कंपनीने निष्ठुरपणाचा कळस गाठून कंपनीतील कामगारांचे 81 दिवसाचे पगार रोखले त्या कामगारांच्या घरातल्या चुली विजल्या त्या चुली पेटवण्याचे काम माननीय नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी केले कामगारांचे 81 दिवसाचे पगार कंपनीशी वाटाघाटी करून मात्र चार दिवसात कामगारांच्या खात्यावर जमा करण्यास कंपनीला भाग पाडले . यामुळे नारायणी कंपनीतील कामगारांमध्ये नितीन भाऊंच्या कामाविषयी व काम करण्याच्या पद्धती विषयी एक आकर्षण तयार होऊन कामगारांनी नितीन मते यांचा आज ढोल ताशांच्या गजरात तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो व मूर्ती देऊन सत्कार केला .या सत्कार वेळी बोलताना नितीन भाऊंनी मी सदैव आपल्या पाठीशी राहील आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये आपण ज्या ज्या वेळेस मला आवाज द्याल त्या वेळी मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून सदैव आपल्या सोबतीला राहील . आपणा सर्वांना एकच विनंती की आपण सर्वांनी संघटित असलं पाहिजे आपण संघटित असलो की अशा निष्ठूर कंपन्यांना वाटणीवर आणण्यास वेळ लागत नाही यावेळी श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, श्री कमलकांत कळसकर शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती, श्री अक्षय मन्ने, श्री एकरे साहेब व नारायणी कंपनीतील शेकडो कामगार उपस्थित होते*

Comments