आंदोलन करत्या १०० हून अधिक महिलांना पोलिसांच्या मदतीने घेतले ताब्यात**

*आंदोलन करत्या १०० हून अधिक महिलांना पोलिसांच्या मदतीने घेतले ताब्यात*

*३३६ ग्रामीण महिलांनी केपीसीएल कंपनीची कोळसा वाहतूक रोखली*

*उपोषणाचा ४२ वा दिवस : उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले*

अतुल कोल्हे भद्रावती :
                कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड  कंपनीच्या विरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज ४२ वा दिवस आहे.  ग्रामीण भागातील महिलेने केपीसीएल कोळसा खाणीतील वाहतूक दोन दिवसांपासून बंद ठेवली होती, मात्र तहसील व पोलीस प्रशासनाने कोळसा वाहतूक सुरू केली व आंदोलन करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशावरून या प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आंदोलन उधळून लावले, असा आरोप ग्रामीण महिलांनी केला आहे.अवैध कोळसा उत्खनन करणाऱ्या केपीसीएलला पाठीशी घालून प्रशासन बरांज प्रकल्पग्रस्त महिलांवर अन्याय करत आहे.असा आरोप ग्रामस्थ महिलांनी केला आहे. 
 बरांज मोकासा येथील केपीसीएल कंपनीने ९०० एकर जमीन संपादित करून कोळशाचे उत्पादन केले आहे, मात्र १२६९ घरांना गावातील नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पुनर्वसनही झालेले नाही.
 केपीसीएल कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यांना मोबदला दिला नाही.  बरांज मोकासा येथे राहणाऱ्या शेकडो घरांवर कब्जा करून कोळसा उत्पादन सुरू केले आहे.
 गेल्या ४२ दिवसांपासून ग्रामीण महिला उपोषणाला बसल्या असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन महिलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  जीव गेला तरी उपोषण संपवणार नसल्याचं अजूनही उपोषणावर असलेल्या महिलांनी सांगितले.

 याबाबत भाद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना विचारणा केली असता केपीसीएलच्या विरोधात गावातील महिला ४१ दिवसांपासून उपोषणावर होत्या.  या मागणीबाबत केपीसीएल कंपनीचे उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठका झाल्या, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.  अखेर शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व  उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत  जवळपास १०० महिलांना ताब्यात घेतले.

Comments