कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

सुरजागड लोह उद्योगात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार काय?

सुरजागड लोह उद्योगात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार काय?

आठ हजार रोजगार निर्मिती करण्याचा दावा.

नऊ महिन्यापूर्वी मुंबई येथील कंपनी लोह उद्योगात .

चंद्रपूर.  २०/जानेवारी २०२४

राज्य सरकार सोबत 16 जानेवारीला झालेल्या करारानुसार सुरजगड लोह. प्राय लिमिटेड ही कंपनी गडचिरोली जिल्ह्यात दहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून ग्रीनफिल्ड इंटिग्रेट पोलाद प्रकल्प उभारणार आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ हजारावर रोजगार निर्माण होतील असा दावा केला जात आहे मात्र नऊ महिने आधी स्थापन झालेली कंपनी दहा हजार कोटीची गुंतवणूक करणार कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रजिस्ट्रेशन क्रमांक ४००९५० या कंपनीची मुंबईत आर ओ सी नोंदणी झालेली आहे.
17 एप्रिल 2023 रोजी कंपनीची नोंदणी झालेली आहे.
कंपनीची स्थापना नऊ महिने होत नाही तोच कंपनीने दहा हजार कोटीच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
या कंपनीचे अधिकृत भांडवल पाच कोटी रुपये आणि पॅड कॅपिटल एक लाख रुपये आहे.

करार पत्रानुसार सुनील जोशी कंपनीचे अध्यक्ष दाखवले आहे. मात्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या कंपनीत संबंधित नावाची कुठली व्यक्ती संचालक पदी नाही.

कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या दस्तएवजानुसार सुरजगड लोह.प्राय लिमिटेड मध्ये वेदांत जोशी व स्वप्ना जोशी नामक केवळ दोन संचालक आहे.

Comments