हर घर रंगोली स्पर्धेला वरोरा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद.*पैठणी साडी साठी प्रथम पुरस्कार विजेत्या प्रिया बोरा व साक्षी मालविय*

हर घर रंगोली स्पर्धेला वरोरा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद.

पैठणी साडी साठी प्रथम पुरस्कार विजेत्या प्रिया बोरा व साक्षी मालविय


वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा शहरात  भारतीय जनता पक्षातर्फे हर घर रंगोली स्पर्धेचे आयोजन 12 प्रभागामध्ये मध्ये करण्यात आले आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष तर्फे रांगोळी स्पर्धकांना पैठणी साडीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे मत डॉक्टर सागर वझे यांनी सांगितले. 

 सरदार पटेल वार्ड व टिळक वार्ड‌‌‌ या प्रभागात शनिवारी स्थानिक गजानन मंदिराच्या समोर ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये सीमा पिसाळ यांच्यातर्फे दोन पैठणी देण्यात आल्या होत्या. यामध्ये बेटी बचाव बेटी पढावो, आणि पर्यावरण या दोन विषयांवर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. यामध्ये पन्नास स्पर्धकांनी भाग घेतला होता या यामध्ये बेटी बचाव बेटी पढावो या विषयावर प्रथम पैठणी विजेती साक्षी मालविय, द्वितीय राणी यादव, तृतीय रूपाली सौरंगपते व वृषाली ढवस तर पर्यावरण या विषयावर प्रथम पैठणी विजेती प्रिया बोरा, द्वितीय विशाखा लुतडे, तृतीय रेणू हनवते  यांना देण्यात आला.  इतर सर्व स्पर्धकांना  संक्रांति निमित्त सीमा पिसाळ व बाळू पिसाळ यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आले.
 स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर साक्षी उपलांचीवार, संध्या बारई , सहारे मॅडम यांनी केले.
या

संक्रांतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आल्याने महिलांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. यावेळी रांगोळी स्पर्धकासाठी 

विनायक वझे मेमोरियल ट्रस्ट तर्फे तीन स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येणार असून वरोरा  शहरासाठी प्रत्येक वार्डातील विजेते पुरस्काराची आंबेडकर चौक येथे भव्य दिव्य स्पर्धा काही दिवसातच होणार असून यामध्ये सर्व पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

त्यामुळे महिला गटात या स्पर्धेविषयी उत्सुकता लागली असून भारतीय जनता पक्षाचा हा अभिनव उपक्रम शहरासाठी महिलांचे मनोबल वाढविणारा ठरला आहे. 

या कार्यक्रमासाठी डॉक्टर सागर वझे, बाळू पिसाळ, सीमा पिसाळ, राहुल बांदुरकर, रामजी, विशाखा लुतडे, गांधी काकू, माणिक उरकुडे, प्रशांत लोहकरे, किशोर भोयर, हरीश वैद्य, नेमचंद चौखे आधी लोकांनी मोलाचे परिश्रम केले.

Comments