मोराची शिकार प्रकरणात आरोपी गजाआड

मोराची शिकार प्रकरणात आरोपी गजाआड

वरोरा 
दिनांक 15/01/2024 रोजी दुपारी 03.00 वाजताचे दरम्यान सतीश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांना मौजा वाघोली येथे मोराची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली, त्याआधारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनकर्मचारी श्री. जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, श्री. डि. बी. चांभारे क्षे स. टेमुडी श्री. चंदेल वनरक्षक, श्री. लड़के वनरक्षक व श्री. बोढे वनरक्षक यांनी घटणास्थळी जाऊन चौकशी केली असता आरोपी नामे विलास आडकु नन्नावरे रा. वाघोली वय. 42 वर्षे पो. शेगाव, ता. वरोरा, संयुक्त वनव्यवस्थापन समिती वाघोली अध्यक्ष 2) रामदास वामन जिवतोडे रा. वाघोली वय. 34 वर्षे पो. शेगाव. ता. वरोरा व 3) दिगांबर तुळशिराम गजबे रा. वाघोली वय. 33 वर्षे पो. शेगाव. ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचे जवळ मोराचे 3.100 ग्रॅम मास, लोखंडी सुरा 01 नग, लोखंडी हुक 01 नग, मोराचे पाय 04 नग, मोराचे पंख व औषधी टाकलेले धान्य 1 किलो असा मुद्देमाल आढळून आला. साहित्य जप्त करण्यात आलेले असुन त्याचेवर प्रा.अ.सु.क्र. 09169/229205 दिनांक 15/01/2024 भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पुढील चौकशी मा. प्रशांत खाडे विभागीय वनअधिकारी चंद्रपूर व मा. घनश्याम नायगमकर सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), (अतिरिक्त) चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा, जितेंद्र लोणकर क्षे. स. शेगाव, दिवाकर चांभारे, क्षे. स. टेमुर्डा, चंदेल वनरक्षक मेसा, लड़के वनरक्षक साखरा, बोटे वनरक्षक शेगाव, तिखट वनरक्षक वरोरा व नेवारे वनरक्षक आजनगाव करीत आहे.

Comments