रविंद्र शिंदे यांची शिवसेना पक्षातील समाजकारणातून राजकारणाची वाटचाल अभिनंदनीय : किशोरी पेडणेकर**

*रविंद्र शिंदे यांची शिवसेना पक्षातील समाजकारणातून राजकारणाची वाटचाल अभिनंदनीय : किशोरी पेडणेकर*

*शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांचेशी स्त्री शक्ती संवाद यात्रा दरम्यान संवाद*

*"होवू द्या चर्चा" उपक्रमाचा कार्य अहवाल देवून स्वागत*
वरोरा :
          शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माध्यमातून दिनांक १७ ते १९ जानेवारी दरम्यान स्त्री शक्ती संवाद यात्रा पार पडली. या यात्रेत शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, राजुल पटेल, शितल शेठ यांचेसह शिवसेना संपर्क संघटक रंजना नेवाळकर आदी उपस्थित होत्या. या यात्रेदरम्यान शिवसेना चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर व इतर महिला पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होत्या.

या स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून पूर्व विदर्भ आढावा घेण्यात आला. पूर्व विदर्भातील अमरावती यवतमाळ वाशीम रामटेक आदी लोकसभा व विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. शिवसेना संपर्क संघटक रंजना नेवाळकर यांच्याकडे जवाबदारी मिळाली त्यानंतर त्यांनी पूर्व व पश्चिम विदर्भाचा आढावा घडवून आणला.
या निमित्ताने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच स्वागत करून त्यांना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर यांनी "होवू द्या चर्चा" या उपक्रमाचा कार्य अहवाल भेट दिला.

या दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या कार्याची पाहणी केली. रविन्द्र शिंदे यांच्या नेतृत्वातील वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी या क्षेत्रातील पक्षाचे काम चांगले सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. या कार्याची विशेष दखल घेत किशोरी पेडणेकर यांनी हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पाईक होवून ८०% समाजकारण व २०% राजकारण या ब्रीदवाक्याला घेवून येथे पक्षाचे कार्य सुरू असल्याचे बोलून दाखविले. "होवू द्या चर्चा", च्या माध्यमातून शिवसैनिक घराघरात पोहोचले. हे अभिनंदनीय आहे. रविंद्र शिंदे करीत असलेली जनसेवा इतरांना आदर्शवत आहे, असेही त्या म्हणाल्या.

पक्षाचे काम करताना काही अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधा, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपास्थित होते.

Comments