विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर वरोऱ्यात जल्लोष
वरोरा : शिवसेनेच्या शिंदे गटाचे बारा आमदार अपात्र करण्यासंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना शिंदे गटाची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे घोषित करून शिंदे गटाचे कोणतेही आमदार अपात्र होणार नाही असा निर्णय दिला. हा निर्णय येतात चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह शिवसैनिकांनी आनंदवन चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी स्थानिक शिवसेना कार्यालयात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते आनंदवन चौक येथे उपस्थित होते .
Comments
Post a Comment