*वरोरा-भद्रावती विधानसभा युवासेना प्रमुख अभिजीत कुडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा व गद्दारांचा केला भांडाफोड*
वरोरा :
वरोरा-भद्रावती विधानसभा युवासेना प्रमुख अभिजीत कुडे यांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे संकल्पनेतुन जनतेपर्यंत "होवू दया चर्चा" जनसंवाद या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा व गद्दारांचा भांडाफोड कशा पद्धतीने केला, याची माहिती नाशिक येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात दिली.
आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी नाशिक अधिवेशनात “होऊ द्या चर्चा” या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या व भाजपाच्या गद्दारांचा जनतेमध्ये जावुन भांडाफोड करावा असे आदेश पदाधिका-याना दिले होते.
त्यानुसार सदर उपक्रम वरोरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या राबविण्यात आला. यात वरोरा-भद्रावती विधानसभा युवासेना प्रमुख अभिजीत कुडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
नाशिक येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी अधिवेशनात वरोरा-भद्रावती विधानसभा युवासेना अधिकारी अभिजीत कुडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या सरकारच्या कामाची व योजनेची पुरेपूर कल्पना व गद्दारांची गद्दारकी, लोकशाहीची हत्या कशा प्रकारे केल्या जात आहे, हे जनतेपर्यंत "होवू दया चर्चा" जनसंवाद या माध्यमातून कशा पद्धतीने पोहोचविण्याचे काम विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे सकल्पेनेतुन चालू आहे. हे नाशिक राज्यव्यापी अधिवेशनात शिवसेना नेते महाराष्ट्र राज्य विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राजन साळवी, आमदार नितीन भाऊ देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे, प्रदेश प्रवक्ते अनिस गाडवे, युवासेनेच्या समन्वयक अयोध्याताई पोड तसेच सन्मानीय शिवसेना पक्षाचे शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार व पदाधिकारी “होऊ द्या चर्चा जनसंवाद” माध्यमाची माहिती देण्यात आली असून याविषयी चर्चा ही करण्यात आली.
सदर विषयी खासदार अनिल देसाई यांनी वरोरा-भद्रावती विधानसभेमध्ये रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्यातून राबवत असलेल्या त्यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या, भारतीय जनता पार्टी व गद्दाराचा भांडाफोड सतत करण्यात येत आहे हे कौतुकास्पद बाब असून या कार्यपद्धतीची नोंद घेऊन संपूर्ण राज्यामध्ये “होवु द्या चर्चा” जनसंवाद हा कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे, चंद्रकांत खैरे माजी खासदार व आमदार राजन साळवे यांनी कौतुक केले की खरोखरच असे निष्ठावंत प्रामाणिक काम केले तर नक्कीच भगवा फडकेल, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी राज्यात ज्या प्रकारे होऊ दे चर्चा कुठे झाली नसुन खरोखर असे अप्रतिम कार्य वरोरा-भद्रावती विधानसभेमध्ये विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे करीत आहे. तसेच आज होत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिवेशनासाठी उपस्थित राज्यातील सर्व नेते उपनेते व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे आपापल्या भागामध्ये आपापल्या क्षेत्रांमध्ये होऊ द्या, चर्चा जनसंवाद राबवावी हे मत व्यक्त केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी सुद्धा या कार्याची दखल घेऊन अधिवेशनच्या सभेमध्ये "होऊ द्या चर्चा" या माध्यमातून केंद्र राज्य शासनाच्या व भाजपाच्या गद्दाराचा भांडाफोड करावा असे आव्हान केले.
या प्रसंगी, पूर्व विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, पूर्व विदर्भ संघटिका प्रा.शिल्पाताई बोडके,पूर्व विदर्भ युवा सेना विभाग सचिव श्री निलेश बेलखेडे, ७५, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, चंद्रपूर जिल्हा महिला संघटिका नर्मदाताई बोरेकर (वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी ), सौ उज्वलाताई नलगे (चंद्रपूर, राजुरा, बल्लारशाह), भास्कर ताजने उपजिल्हाप्रमुख ( वरोरा भद्रावती विधानसभा )चंद्रपूर जिल्हा युवा सेना प्रमुख रोहन कुठेमाटे, चंद्रपूर जिल्हा युवती सेना अधिकारी कु. प्रतिभा मांडवकर(वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी), विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा भद्रावती विधानसभा युवासेना प्रमुख अभिजीत कुडे,भद्रावती नगर परिषद माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे,युवा सेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी चंद्रपूर जिल्हा संघटिका नीलिमाताई शिरे, कामगार सेनेचे महासचिव अमोल मेश्राम, नागपूर जिल्हा संघटक राधेश्याम भाऊ हटवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment